ट्विटर वापरताय ? मग लगेच आपला पासवर्ड बदला !!

ट्विटरने नुकतच एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्व युझर्सना त्यांचा पासवर्ड बदलण्याबाबत विनंती केली आहे. जर तुम्ही सुद्धा ट्विटर वर असाल तर लगेच तुमचा पासवर्ड बदला. त्यामागे कारणही तेवढच महत्वाचं आहे.

स्टोअर्ड पासवर्डच्या इंटर्नल लॉगमध्ये बग आल्यामुळे तुमच्या ट्विटर अकाऊंटचा गैरफायदा घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ट्विटरने खबरदारी म्हणून सर्वांना पासवर्ड बदलण्याची सूचना दिली आहे. तूर्तास तरी कोणत्याही युझरकडून अशी कोणती तक्रार करण्यात आलेली नाही.

सध्या डेटा चोरीची केस गाजत आहे. त्यानिमित्ताने ट्विटरने दिलेला हा इशारा महत्वाचा ठरू शकतो. काही दिवसापूर्वीच ‘द संडे टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने ट्विटरने डेटा विकल्याची माहिती दिली होती.

शेवटी काय तर, फेसबुक, EPF नंतर आता ट्विटर सुद्धा सुरक्षित नसल्याचं सिद्ध झालं आहे....

 

आणखी वाचा :

फेसबुकने आणलं डेटिंग अँप, आता मेसेंजरमध्ये j1 झालं का विचारायची गरज नाही ना भाऊ !!

सबस्क्राईब करा

* indicates required