फेसबुकने आणलं डेटिंग अँप, आता मेसेंजरमध्ये j1 झालं का विचारायची गरज नाही ना भाऊ !!

मुली पटवण्यासाठी हजारो युवक फेसबुकचा मार्ग धरतात. फेसबुक जरी मैत्री करण्यासाठी असलं तरी त्याच्या मागचं कारण हे सर्वज्ञात हाय राव. आता हे फेसबुकवाल्यांना माहित नसेल असं होणार हाय का. त्यांनी काय केलंय आता ऑफिशियली ‘डेटिंग फिचर’ आणलंय भाऊ.

आधी कसं होतं. पोरं पोरींना रिक्वेष्ट टाकायची मग पोरीने रिक्वेष्ट एक्सेप्ट केली की मैत्रीच्या बहाण्याने तिला प्रपोज करायची. आता ते दिवस गेले राव. आता डेटिंग अॅपमुळे डायरेक्ट पोरींना डेटसाठी विचारायचं. कसंय ना आता काहीपन लपवून होणार नाय. सगळं कसं बिंदास.

स्रोत

राव, तुम्हाला तुमची डेटिंग प्रोफाइल आणि सध्याची फेसबुक प्रोफाइल वेगवेगळी ठेवता येईल. तुमच्या फ्रेंडलोकांना तुमी डेटिंग अॅप वापरताय याचा पत्त्याच लागणार नाहीए. फेसबुकवाल्यांनी तुमची माहिती शिक्रेट राहील याची पूर्ण जबाबदारी घेतली हाय राव.

आता तुम्हाला ही फेक न्यूज वगैरे वाटल पन आपला झुक्या भाऊने याबद्दल ऑफिशियली घोषणा केली असल्यानं त्याच टेन्शन नाय. फेसबुकमुळे सध्या फेमस असलेले टिंडर, ओकेक्युपिड, बम्बल, हिंज या डेटिंग अॅप्सना आता जबरदस्त टक्कर मिळणार हाय भौ...

 

आणखी वाचा :

आता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज !! कसा ? वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती