बापरे, या माणसाला स्वतःचा रक्तगट जाणून घेण्यासाठी RTI का दाखल करावा लागला ??

राव, सरकारी कामकाज आणि इतर महत्वाच्या गोष्टींच्या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी RTI म्हणजे माहितीच्या अधिकाराचा वापर केला जातो. पण आग्र्याच्या एका व्यक्तीने चक्क आपला रक्तगट जाणून घेण्यासाठी आरटीआय अंतर्गत अर्ज दाखल केला आहे. राव, त्याच्यावर अशी कोणती वेळ आली की त्याला थेट माहितीचा अधिकार वापरावा लागला ?....चला जाणून घेऊ !!

स्रोत

राव त्याचं झालं असं की, राहुल चित्रा या व्यक्तीने रक्तगट जाणून घेण्यासाठी रक्ताची चाचणी करून घेतली. या चाचणीतून त्याला जे अनुभव आले ते धक्कादायक होते. त्याने एस. एन. मेडिकल कॉलेज आग्रा येथल्या ४ वेगवेगळ्या विभागात रक्ताची चाचणी करून घेतली. पण या चारही जागी त्याला वेगवेगळे रिपोर्ट मिळाले. या रिपोर्ट मध्ये ४ वेगवेगळे रक्तगट त्याला दाखवण्यात आले होते.

या प्रकारानंतर त्याने दिल्लीतले पंत रुग्णालय गाठले. या रुग्णालयात त्याच्या २ चाचण्या झाल्या आणि त्याला पुन्हा तोच अनुभव आला. एका चाचणीत बी निगेटिव्ह तर दुसऱ्या चाचणीत बी पॉझिटिव्ह रक्तगट असल्याची माहिती देण्यात आली. हा गोंधळ बघून त्याने ‘मेडिकल काऊंसिल ऑफ इंडियाकडे’ मदत मागितली पण काहीच उपयोग झाला नाही.

स्रोत

शेवटी त्याने केंद्रीय माहिती आयोगाकडे आपला प्रश्न उपस्थित केला. ‘माझा रक्तगट कोणता ?...इमर्जन्सीच्या वेळी मला रक्ताची गरज लागली तर कोणतं रक्त देण्यात येईल ?’ असा प्रश्न त्याने विचारलाय.

राव, माहिती आयोगाने याकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं आहे. माहिती आयोगातर्फे त्याची रवानगी एम्स या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात करण्यात येणार आहे. एम्स मध्ये त्याच्या रक्तावर संशोधन केलं जाईल. शेवटी त्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे.

मंडळी, RTI च्या इतिहासातील ही एक आगळी वेगळी केस म्हणता येईल.

 

आणखी वाचा :

तुम्ही तुमच्या स्वतःच्या पांढऱ्या रक्तपेशी उघड्या डोळ्यांनी पाह्यल्या आहेत.. विश्वास नाही बसत ? मग हे वाचाच

सबस्क्राईब करा

* indicates required