आख्ख्या विमानात हा एकच प्रवासी होता ? मस्त चंगळ झाली राव याची..

आपण विमान प्रवास करतोय आणि विमानात फक्त आपण एकटेच प्रवासी आहोत हा अगदीच दुर्मिळ योग आहे. साद जिलानी या व्यक्तीच्या नशिबी हा योग आलाय राव. अख्ख्या विमानात तो एकटाच प्रवासी होता. त्याला विमानातील कर्मचाऱ्यांकडून स्पेशल ट्रिटमेंट मिळाली. पण असं झालं तरी कसं ? पूर्ण विमानात फक्त तोच एकटा प्रवासी कसा ?

स्रोत

त्याचं झालं अस, हे विमान होतं जेट२ एअरवेजचं नवीन कोरं ‘बोईंग ७३८’. हा विमानाचा पहिलाच प्रवास होता. विमानात १६८ प्रवाशांसाठी जागा होती. पण आश्चर्य म्हणजे साद जिलानी सोडून कोणीच सीट बुक केली नव्हती. मग काय साद जिलानी हा पूर्ण विमानातला एकमेव प्रवासी ठरला. 

स्रोत

विमानतळावर असतानाच सादला कळवण्यात आलं होतं की तो एकटाच या विमानातून प्रवास करणार आहे. त्यामुळे तो उत्साही होताच. पण विमानातील स्टाफ सुद्धा उत्साहित होते. त्यांना सादला अगदी दुर्मिळ अनुभव द्यायचा होता. 

विमानातील कर्मचाऱ्यांनी त्याचं स्वागत करताना म्हटलं ‘आपल्या खाजगी जेटमध्ये आपले स्वागत आहे सर’ 

स्रोत

विमानाने उड्डाण घेतल्यानंतर खरी मजा सुरु झाली. साद आणि तिथल्या स्टाफने सेल्फी घेतले. सर्व स्टाफने एकत्र मिळून त्याला सुरक्षेचं प्रात्यक्षिक दाखवलं. हे प्रात्यक्षिक चालू असताना त्याने व्हिडीओ सुद्धा काढला. यासोबतच स्टाफ सोबत गप्पा मारण्यात, सिनेमा बघण्यात आणि गाणी ऐकण्यात त्याने वेळ घालवला. एवढंच नाही तर त्याने पायलटच्या सीटवर बसण्याचा अनुभवही घेतला. साद म्हणतो त्याप्रमाणे ‘ही माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय फ्लाईट होती’

स्रोत

सर्व मजामस्ती झाल्यावर त्याने थोडी झोपपण काढली. नेहमीच्या विमानात असतो तसा त्रास त्याला झाला नाही. एकमेव प्रवासी असल्याने त्याने मस्त ताणून दिली.

स्रोत

राव, हे म्हणजे लाखातलं एक उदाहरण झालं. आम्हाला तुमच्या विमान प्रवासाचे किस्से ऐकायला आवडतील. कमेंट बॉक्स मध्ये तुमचे अनुभव सांगायला विसरू नका.

 

आणखी वाचा :

विमानाच्या खिडक्यांना असलेल्या या छिद्रामागाचे लॉजिक पटकन वाचून घ्या बरे !!

विमानातल्या ऑक्सिजन मास्कमधला ऑक्सिजन इथून येतो बरं !!

सबस्क्राईब करा

* indicates required