या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी चक्क नोटांचा डोंगर उभारला...

भाऊ, नोकरी करणाऱ्या प्रत्येक माणसाला बोनस मिळण्यासाठी धडपड करावी लागते. काही लोकांना त्यासाठी संप करावा लागतो तर काही लोकांना बोनसमध्ये सहजपणे गाड्या आणि फ्लॅट्स मिळतात. अर्थात नंतर बातमी येते की कंपनीनं काही सगळंच फुकट दिलं नाही तर थोडे लोकांचे पैसे पण कापून घेतेले. असो.. हे सगळं आज आठवायचं कारण असंय की आज एक बातमी व्हायरल झाली आहे. त्यात चीनमधल्या एका कंपनीने  बोनस देण्यासाठी नोटांचा डोंगर उभा केलाय.

स्रोत

 मंडळी, चायनीज कॅलेंडर नुसार ५ फेब्रुवारीला ते लोक नवीन वर्ष साजरे करतात. त्यासाठी आपल्याकडे जशी आपण दिवाळी साजरी करतो तसाच उत्सव  चायनीज लोक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी करतात. या सुमारास वसंत ऋतूचं आगमन होतं त्यामुळं न्यू इअर फेस्टिवलला स्प्रिंग फेस्टिवलसुद्धा म्हणतात.  भारतात सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस दिवाळीत दिला जातो. चीनमध्ये हा बोनस नवीन वर्षाच्या सुरवातीला दिला जातो.

स्रोत

तर, चीनमध्ये जियांगशी नावाचा एक प्रदेश आहे. त्या प्रदेशाची राजधानी नानचांगमधल्या एका स्टील कंपनीने एक भलतीच शक्कल लढवली आहे. त्यांनी बोनस वाटण्यासाठी नोटांचा डोंगर उभारला. थोडीथोडकी  रक्कम नाही  तर ३०० मिलियन युआन म्हणजेच साधारण ३१५ कोटी रुपयांच्या नोटाचा डोंगर उभारला. या कंपनीत साधारण ५००० कर्मचारी कामाला आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला ६००० युआन म्हणजेच ६.३ लाख रुपये वाटले आहेत.

स्रोत

या कंपनीने बोनस तर वाटलाच, पण फुकटची पब्लिसिटी पण मिळवली. मंडळी एकीकडे चायनीज कंपन्या कर्मचाऱ्यांना कुत्र्यासारखे वागवतात आणि त्याचे व्हिडीओ व्हायरल पण होतात. ते बघता हा पण फक्त दिखावाच असावा असे आम्हाला वाटते. तुम्हांला याबद्दल काय वाटतं?

 

आणखी वाचा :

व्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा!!

सबस्क्राईब करा

* indicates required