computer

गुगल असिस्टंटला लग्नाची मागणी घालताय ? मग गुगलच्या या प्रश्नाचं उत्तर द्याच !!

आपली कामं सोप्पी व्हावीत म्हणून गुगलने गुगल असिस्टंट तयार केलाय. आपल्याला बऱ्याचदा ‘टाईप’ करण्याचा कंटाळा येतो, मग आपण गुगल असिस्टंटला सांगून हवं ते शोधू शकतो. किंवा नुसतं सकाळचा अलार्म लाव म्हटलं तरी गुगल असिस्टंट ते निमूटपणे करते. एवढंच काय गुगल असिस्टंटला गुणाकार भागाकार अशी गणितं विचारली तरी ती झटक्यात उत्तर देते.

मंडळी, गुगल असिस्टंटचे असे कितीतरी उपयोग आहेत, मग भारतीय लोक तिला फक्त लग्नाबद्दलच का विचारत असतात? असा प्रश्न आम्ही नाही तर स्वतः गुगलने विचारला आहे.

राव, सध्या ‘really’ मिम्स व्हायरल होत आहेत. हा काय प्रकार आहे हे माहित नसेल तर आम्ही सांगतो. या प्रकारामध्ये ‘really ‘ या शब्दाची रांग लावली जाते आणि शेवटी एक प्रश्न विचाराला जातो. याचा वापर सोशल मिडीयावर प्रचंड प्रमाणात होत आहे. इंटरनेटचा किंग गुगलने पण हाच मिम प्रकार वापरून भारतीयांना विचारलं आहे “अरे बाबांनो तुम्ही सारखं गुगल असिस्टंटला लग्नाची मागणी का घालत असता ??”

मंडळी, या प्रश्नाला ट्विटरकरांनी दिलेली मजेशीर उत्तरं पाहण्यासारखी आहेत. यातलं कोणतं उत्तर तुम्हाला पटतंय ??

मंडळी, मराठी युझर्ससाठी गुगलने ‘गुगल असिस्टंट’ मध्ये काही खास बदल केले आहेत. तुम्ही गुगल असिस्टंटला मराठीतून लग्नाची मागणी घातल्यावर ती मराठी मुलीप्रमाणे ठसकेबाज उत्तर देते. याशिवाय तुम्ही गुगल असिस्टंटशी मराठीतून गप्पा सुद्धा मारू शकता. यासाठी काय करायचं, काय सेटिंग असते वगैरे माहिती समजून घेण्यासाठी आमचा खालील लेख वाचायला विसरू नका !!

गुगल असिस्टंटला मराठीत प्रपोज करुन पाहा ती तुम्हांला काय उत्तर देते...

सबस्क्राईब करा

* indicates required