computer

पाकीट चोरून पळालेले चोर ATM चा पिन मागायला परत आले... पुढे काय झालं पाहा !!

अक्कल आणि शिक्षणाचा तसा अर्थोअर्थी काही संबंध नसतो. शिकलेले लोकही कधी अक्कलशून्यता दाखवतात, तर कधी शाळेत पाऊल न ठेवलेली व्यक्तीही काहीतरी छान शिकवून जाते.

आज अकलेचं काय काढलं असं विचाराल, तर उत्तर आहे- अक्कलशून्य चोरांची नुकतीच घडलेली गोष्ट!!

झालं असं की उत्तर प्रदेशातल्या नोएडा येथे एका गृहस्थाचे मोबाईल आणि पाकिट चोरांनी चोरले. नोएडामध्ये असं घडणं हे काही नवं नाही. उलट तिथं नेहमी जे काही घडतं त्यामानाने हे अगदीच क्षुल्लक आहे. तर असो. हे चोर लोक मोबाईल आणि पाकिटातल्या पैशांवर संतुष्ट झाले नाहीत. यावर त्यांनी काय करावे? तर चक्क परत येऊन त्यांनी त्या माणसाला त्याच्या ATMचा पिन विचारला. त्याला धमकावून पिन माहीत झाल्यावर ते पळून गेले.

ज्या माणसाचं पाकिट चोरीला गेलं त्यानं साहजिकच ही गोष्ट पोलिसांना कळवली. चोर पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी गाड्यांचं चेकिंग सुरु केलं. चेकिंग दरम्यान चोरांनी पोलिसांवर गोळीबार करून पळून जायचा प्रयत्न केला, पण शेवटी पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल पोलिसांनी जमा केले आहेत.

सध्या अशाप्रकारे स्वॅग (!) दाखवून चोऱ्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याआधी एकदा काही चोर सीसीटीव्ही समोर नाचताना दिसले होते. पण कितीही स्वॅग दाखवला तरी आज ना उद्या पोलिसांचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचत असतातच. आता हा स्वॅग होता की अक्कलशून्यता हे त्या चोरांनाच माहित!!!

 

आणखी वाचा :

ATM मशिनच्या जागी पासबुक प्रिंटींग मशीन चोरली...वाचा लुक्ख्या चोरांची कथा !!!

 

सबस्क्राईब करा

* indicates required