ताईंचा दुष्काळी सेल्फी !

सेल्फीच्या क्रेझबद्दल काही नवीन सांगायला नको. मेलेल्या काकापासून ते पार हायजॅक करणाऱ्या अतिरेक्याबरोबर असे कुठेही, कधीही, कोणाबरोबरही सेल्फी काढणारी माठ (डोक्याची) माणसे या जगात आहेत हे वारंवार सिद्ध झालेलं आहे्च. याच सेल्फी मोहाला बळी पडल्याचे परिणाम कसे वाईट होतात याचे उदाहरण काल सोशल मिडीयावर पुन्हा एकदा दिसून आले. मांजरा नदीवर सुरु असलेल्या कामाची पाहणी करत असताना तिथल्या पाण्याला बघून भारावलेल्या ग्रामविकासमंत्री पंकजा ताईंना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. विरोधकांनी या दुष्काळी सेल्फीचा खरपूस समाचार घेतला. एकीकडे पाण्यासाठी महिला मैलोन-मैल फिरत असताना अशा प्रकारे सेल्फी काढून दुष्काळाचे पर्यटन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या पंकजा मुंडेंनी सारवासारव केली खरी पण सोशल मिडियाने त्यांना चांगलच धारेवर धरलेलं दिसतंय. पण इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की भारतीय सेल्फीची ही परंपरा काही नवी नाही ती आमच्या पंतप्रधानांपासून चालत आलेली आहे. तर पंकजा ताईंच्या या पहिल्या वहिल्या सेल्फीला नावं ठेवण कितपत बरं याचाही विचार व्हावा.

सबस्क्राईब करा

* indicates required