बापरे!! चक्क एका सेल्फीने त्याला आजन्म कारावासापासून वाचवलं??

हल्ली आपण सहज म्हणून सेल्फी घेतो पण याच साध्या सेल्फिने एका तरुणाला जेलमध्ये जाण्यापासून वाचवलं आहे राव. जर ही सेल्फी त्याने घेतली नसती तर त्याला तब्बल ९९ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली असती. चला तर जाणून घेऊया हा प्रकार आहे तरी काय!!
ख्रिस्तोफर नावाच्या तरुणाला पोलिसांनी अचानक अटक केली. त्याच्यावर आरोप होता की त्याने त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरात घासून तिचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. ख्रिस्तोफरला अटक झाली तेव्हा त्याला माहितीही नव्हतं की त्याला कोणत्या आरोपाखाली अटक झाली आहे. पोलिसांनी हे गृहीतच धरलेलं की याच्यासारख्या नराधमाला आपण का पकडले जात आहोत याची नक्कीच कल्पना असणार.
या मागची गोष्ट अशी की त्याचा आणि त्याच्या तथाकथित गर्लफ्रेंडचा बऱ्याच वर्षात संपर्कही नव्हता. दोघात मतभेद असल्याने त्यांचा फार पूर्वीच ब्रेकअपही झाला होता. एकंदरीत हा आरोप खोटा होता. पण हा गंभीर आरोप त्याच्यावर लावण्यात आला आणि शेवटी त्याला जेल झाली. त्याला शिक्षा म्हणून तब्बल ९९ वर्ष तुरुंगवास देण्यात आला. पण तेवढ्यात त्याच्या मदतीला धावून आली ती त्याने काढलेली सेल्फी.
ज्या दिवशी त्याने हल्ला केला होता त्या दिवशी खरं तर तो घटनास्थळापासून जवळजवळ ११२ किलोमीटर दूर आपल्या आईवडिलांसोबत होता. हे पहिल्यांदा लक्षात आलं ते ख्रिस्तोफरच्या आईला. त्यांनी पोलिसांकडे पुरावा म्हणून ही सेल्फी सादर केली. हल्ल्याची वेळ होती संध्याकाळी ७.२० मिनिटांची तर सेल्फी ७.०५ मिनिटांनी घेण्यात आली होती.
मंडळी, या सगळ्यामध्ये ख्रिस्तोफर जवळजवळ १ वर्ष जेलमध्ये होता. सगळी कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याला नुकतंच सोडण्यात आलं आहे.
एकंदरीत त्याच्या गर्लफ्रेंडने या गंभीर आरोपासाठी चुकीची तारीख निवडली होती राव.
आणखी वाचा :
नॅशनल सेल्फी डे : 10 टिप्स ज्या तुम्हाला देतील सर्वोत्कृष्ट सेल्फी!
जाणून घ्या जगातल्या पहिल्या ग्रुप सेल्फीची कथा...
एका सेल्फीने सोडवली मर्डरची केस...पहा या सेल्फीमध्ये असं आहे तरी काय ?