‘पँजिआ’ महाखंडाचं विभाजन झालं नसतं तर जगाचा नकाशा असा असता...पाहा बरं यात भारत कुठे आहे!!

मंडळी, असं म्हणतात की जवळजवळ ३३ कोटी वर्षापूर्वी ‘पँजिआ’ नावाचा एक महाखंड होता. या महाखंडाचे विभाजन होऊन ७ वेगवेगळे खंड निर्माण झाले. समजा या महाकाय खंडाचे तुकडे झालेच नसते तर ? मग पृथ्वी कशी असती ? आणि हो, भारत नेमका कुठे असता ? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आहेत खाली दिलेल्या नकाशा मध्ये. पाहा बरं भारत कुठे आहे !

स्रोत

मंडळी, भारत सापडला का ? दक्षिणेच्या टोकाला अंटार्क्टिकाच्या शेजारी असलेला देश म्हणजे आपला भारत देश आहे. जवळच ऑस्ट्रेलिया आहे. आफ्रेकेचं मॅदगास्कर बेट भारताच्या पश्चिमेला आहे. आज भारताच्या उत्तरेला चीन आहे, पण ‘पँजिआ’ महाखंडाचं विभाजन झालं नसतं तर चीनची भूमी पृथ्वीच्या अगदी उत्तर टोकाला असती. याशिवाय विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे भारताचं हवामान कसं असतं ? भारतीय कसे असते ? मुळात भारत हा देश तरी अस्तित्वात असता का. असो !! कल्पनेच्या भराऱ्या मारू तेवढ्या थोड्याच आहेत राव.

तर, हा नकाशा ‘मॅसिमो पेट्रोबोन’ या इटालियन कलाकाराने तयार केला आहे. या नकाशाला त्याने ‘पँजिआ पॉलिटिका’ हे नाव दिलंय. यापूर्वीही ‘पँजिआ’चे नकाशे तयार करण्यात आले आहेत, पण मॅसिमोच्या नकाशात आजचे देश ‘पँजिआ’ खंडात कुठे असते हे नेमकं पाहू शकतो.

‘पँजिआ’ खंडाबद्दल थोडक्यात :

स्रोत

तब्बल ३३ कोटी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वी आजच्या अवस्थेत नव्हती तेव्हा ‘पँजिआ’ नामक एकाच एक खंड अस्तित्वात होता. वरील नकाशात त्याचं स्वरूप पाहूच शकतो. १७ कोटी वर्षांपूर्वी या खंडाचं विभाजन झालं. या विभाजनातून अमेरिका (उत्तर/दक्षिण), आफ्रिका, आशिया, अंटार्क्टिका, युरोप, ऑस्ट्रेलिया असे आजचे ७ खंड तयार झाले. अशा पद्धतीने पृथ्वीला आजचा आकार मिळाला.

                             

सबस्क्राईब करा

* indicates required