'स्टॅच्यू ऑफ युनिटी' अंतराळातूनसुद्धा दिसतो.... जगातील सर्वात उंच पुतळ्याचं अंतराळातून दिसणारं रूप पाहिलंत का ??

चीनची भिंत अंतराळातूनही दिसते हे ऐकतच आपण मोठे झालेलो आहोत. आता भारतातही अशी एक वास्तू आहे जी अंतराळातून दिसत आहे. ही वास्तू म्हणजे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ - जगातील सर्वात उंच पुतळा (५९७ फुट) !!

प्लॅनेट या अमेरिकन सॅटेलाइट कंपनीने स्टॅच्यू ऑफ युनिटीची अंतराळातील छायाचित्रे प्रसारित केली आहेत. ही छायाचित्रे स्कायलॅब नावाच्या अत्याधुनिक उपग्रहाद्वारे घेण्यात आली आहेत. या छायाचित्रांच्या माध्यमातून आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीचं अंतराळातून दिसणारं भव्य रूप पाहायला मिळतं. तब्बल ५९७ फुट उंच पुतळयाचं अंतराळातील हे रूप अनोखं आहे.

मंडळी, तुम्ही जर गुगल मॅपद्वारे स्टॅच्यू ऑफ युनिटी शोधायला गेलात, तर तुमची निराशा होऊ शकते. स्कायलॅब सारख्या अत्याधुनिक उपग्रहाच्या सहाय्यानेच स्टॅच्यू ऑफ युनिटीचं वरील रूप पाहायला मिळतं !!  

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ बद्दल थोडक्यात :

सरदार वल्लभभाई पटेलांच्या १४३ व्या जयंतीनिमित्ताने ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळा उभारण्यात आला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी’ चीनच्या स्प्रिंग बुद्धा मूर्तीपेक्षा तब्बल १७७ फुट उंच आहे तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा तब्बल ४४६ फुट उंच आहे.

तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं अंतराळातील रूप पाहिलंत व त्याची माहिती घेतलीत मग आता या भव्य पुतळ्याला तयार करणाऱ्या हातांबद्दलही जाणून घ्या. मूर्तिकार राम सुतार यांच्यावरील आमचा हा लेख वाचायला विसरू नका !!

जगातला सर्वात उंच पुतळा बनवण्याचा मान जातो या मराठी माणसाकडे.. यांनी आणखी कोणकोणते पुतळे बनवले आहेत माहित आहेत का?

 

आणखी वाचा :

जगातली सर्वात उंच गणपतीची आणि हनुमानाची मूर्ती कुठं आहे ठाऊक आहे? नाही, मग तर नक्कीच वाचा...

आधुनिक शिल्पकलेचे १२ अप्रतिम नमुने!!

जाणून घ्या ग्रीक संस्कृतीत देवता आणि खेळाडूंचे पुतळे नग्नावस्थेत का असतात !!

या दोन पुतळ्यांच्या मागे आहे एक करुण प्रेमकहाणी !!

सबस्क्राईब करा

* indicates required