व्हिडीओ ऑफ दि डे : या दोन पुतळ्यांच्या मागे आहे एक करुण प्रेमकहाणी !!

बाटूमी, जॉर्जियाच्या किनाऱ्यावर २६ फुट उंचीचे दोन पुतळे आहेत. या पुतळ्यांचं नाव आहे “Man and Woman”. नावाप्रमाणेच स्त्री आणि पुरुषाचे पुतळे दिसतात पण त्यांना अत्यंत हुशारीने बनवलं गेलंय. हे दोन्ही पुतळे संध्याकाळी ७ वाजता हलतात. दोघे जिवंत असल्या सारखे एकत्र येतात, एका क्षणी असं वाटतं की दोघे एकमेकांचं चुंबन घेत आहेत. मग हळू हळू ते एकमेकात सामावले जातात आणि शेवटी दोन वेगवेगळ्या दशेने जाऊन उभे राहतात. दर दिवशी १० मिनिटाच्या हालचालीत एक पूर्ण लव्ह स्टोरी तयार केली जाते.

मंडळी, हे दोन्ही एका खरोखरच्या प्रेमकथेचं प्रतिनिधीत्व करतात. ती करुण कहाणी आजही स्थानिक लोकांमध्ये लोकप्रिय आहे. चला तर या प्रेमकथेबद्दल आणखी जाणून घेऊया. 

स्रोत

अली आणि निनो या दोघांची ही गोष्ट. गोष्ट तशी लैला-मजनू सारखी फार पूर्वीची नाही. या गोष्टीला सुरुवात होते १९१४ साली. हे दोघेही दोन वेगवेगळ्या संस्कृतीत वाढलेले होते. अली हा मुस्लीम होता तर निनो हि ख्रिश्चन होती शिवाय ती एक राजकन्याही होती. दोघांची प्रेमकथा ज्या पुस्तकात लिहिली गेली आहे त्या ‘अली आणि निनो’ नुसार दोघेही संध्याकाळी ७ वाजता त्याच जागी भेटायचे जिथे आज ते दोन्ही पुतळे उभे आहेत. 

स्रोत

तर, प्रत्येक लव्ह स्टोरी मध्ये असते तशी अडचण यांच्याही कथेत होती. दोघांचे धर्म, संस्कृती, रीतीरिवाज सगळेच वेगळे होते. तरीही दोघांनी लग्न केलंच. राजकीय धामधुमीच्या परिस्थितीत अली अझरबैजानवरील आक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी अझरबैजान मध्ये राहतो तर निनो जॉर्जियाला निघून जाते. तिच्या सोबत त्यांचं बाळही असतं. निनो गेल्यानंतर इकडे अली युद्धात मारला जातो. त्यानंतर दोघांची कधीच भेट होत नाही. अशा प्रकारे या कथेचा दुर्दैवी अंत आहे.

‘अली आणि निनो’ चा लेखक कोण यावर तज्ञांमध्ये वाद आहेत. सध्या तरी लेखक म्हणून ‘कुरबान सईद’ नावाच्या अज्ञात लेखकाचं नाव दिलं जातं. त्याने १९३७ साली ही कादंबरी लिहिली अशी मान्यता आहे.

स्रोत

या दोघांच्या कथेला जगभरात पोहोचवण्याचं काम जोर्जीयान शिल्पकार ‘तमारा क्वेसिटाजे’ यांनी केलं. त्यांनी अत्यंत हुशारीने हे पुतळे साकारले आहेत. पुतळ्यांची हालचाल कशी होते हे आपण खालील व्हिडीओ मध्ये पाहूया !!

 

आणखी वाचा :

वाचा खऱ्याखुऱ्या 'पिके' ची लव्ह स्टोरी !!

सबस्क्राईब करा

* indicates required