नेटफ्लिक्सच्या 'मोगली' चित्रपटात हे ५ हिंदी कलाकार देणार आवाज...तुम्हाला पटते का ही कास्टिंग ?
२०१६ ला तुम्ही जंगल बुक पाहिलाच असेल मग आता तयार व्हा मोगलीच्या एका वेगळ्या गोष्टीसाठी. याला आपण मोगलीच्या गोष्टीतला एक वेगळा धडा आपण म्हणू शकतो. नेटफ्लिक्स लवकरच ‘मोगली- लिजेंड ऑफ दि जंगल’ हा चित्रपट घेऊन येत आहे. आजवर न पाहिलेली मोगलीची गोष्ट यात पाहायला मिळेल.
काही आठवड्यापूर्वी ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आज हिंदी व्हर्जनसाठी निवडण्यात आलेल्या बॉलीवूडच्या कलाकारांची घोषणा झाली आहे. चला तर पाहूया भालू, बघिरा, शेरखान या प्रसिद्ध पात्रांसाठी कोण आवाज देणार आहे ते !!

मोगलीचा जिवलग मित्र ‘भालू’साठी अनिल कपूर आवाज देणार आहे, तर बघिराच्या पात्रासाठी अभिषेक बच्चनचा आवाज असणार आहे. याखेरीज लांडग्यांच्या समूहातील मोगलीच्या आईचा आवाज हा माधुरी दीक्षितचा असणार आहे. एका डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी आवाज देण्याची माधुरीची ही पहिलीच वेळ असणार आहे. मोगलीच्या गोष्टीतलं महत्वाचं पात्र शेरखानसाठी बॉलीवूडच्या भिडूची म्हणजे जॉकी श्रॉफची निवड झाली आहे. ‘का’ या अजगरासाठी तर चक्क करीना कपूर आवाज देणार आहे राव.

तर मंडळी मोगलीच्या गोष्टीसाठी हिंदी कास्टिंग बरोबर आहे का की यापेक्षा वेगळे कलाकार निवडायला हवे होते ? मोगलीचा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला ? आम्हाला नक्की कळवा !!