आता पर्यंत आपण बघितलं की राजकुमारी आणि तिची मैत्रीण भारताजवळ पोहोचले होते. आता बघूया पुढे काय झाले !!
बोटीवरचे लोक काय घडले म्हणतात?
हार्व आणि टीना यांच्या म्हणण्यानुसार ४ मार्चला गोव्यापासून जवळ असताना त्यांच्या बोटीला अचानक इतर दोन बोटींनी वेढा घातला. त्यात मिलिटरीचा पोशाख घातलेले ८ ते १० सशस्त्र जवान होते. त्यांच्याकडे अत्याधुनिक रायफली होत्या. जवानांनी बोटीचा ताबा घेतला आणि आणि त्यांनी सर्व प्रवाशांना मारहाण केली. शेखा लतीफाच्या मुसक्या आवळल्या. ती घाबरून बाथरूममध्ये लपली होती, पण जवानांनी बाथरूममध्ये गॅस बॉम्ब टाकले आणि तिला बाहेर येण्यास भाग पाडले. सर्वांचे हात आणि डोळे बांधले गेले होते. मारहाण सुरूच होती. अशातच तिथे एक हेलिकॉप्टर आले आणि शेखा लतीफाला बोटीवरून उचलले गेले. ती "मला दुबईला परत जायचे नाही" असं जोरजोरात ओरडत होती. परंतु तिचे काहीही ऐकून घेतले नाही. हेच शेखाचे शेवटचे दर्शन! इकडे भारतीय कोस्ट गार्डच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला यातले काहीही माहीत नाही असे सांगून हात वर केले होते. आता मात्र या सर्व घटनेमधले गूढ चांगलेच वाढले होते…









