computer

काय म्हणता, कुत्र्याच्या केसांपेक्षा दाढीत जास्त जंतू असतात ? कसं काय ??

मंडळी, पूर्वी पुरुष मंडळी न विसरता गुळगुळीत दाढी करायची, पण नंतर ‘बियर्ड’ची फॅशन आली आणि सगळा क्रम चुकला. आता दाढी उगायची वाट बघितली जाते. अशी पण अफवा आहे की बियर्डवाला मुलगा मुलींना जास्त आवडतो. पण ते असो.

आजचा मुद्दा हा थोडा वेगळा आहे. दाढी दिसायला एकदम झक्कास असली तरी ते स्वच्छ आहे का ? याचं उत्तर वैज्ञानिकांनी शोधून काढलंय.

तर, स्वित्झर्लंडच्या Hirslanden Clinic येथे झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलंय की कुत्र्याच्या केसात जेवढे जंतू असतात त्यापेक्षा जास्त तर पुरुषांच्या दाढीत असतात.

या अभ्यासात कुत्रा आणि माणूस यांची एकत्रित MRI तपासणी करण्यात आली. यासाठी १८ दाढीवाली  मुलं आणि ३० केसाळ कुत्रे निवडण्यात आले होते. तपासणीत असं दिसून आलं की दाढीत सर्वाधिक सूक्ष्मजीव आहेत. एवढंच नाही तर हे सूक्ष्मजीव एखाद्याला गंभीरपणे आजारी पाडण्यासाठी पुरेसे आहेत असंही आढळून आलं.

राव, आता या अभ्यासावर Hirslanden Clinic चे Andreas Gutzeit यांनी म्हटलंय की “या संशोधनाच्या आधारे आपण म्हणू शकतो की पुरुषांच्या तुलनेने कुत्रे जास्त स्वच्छ आहेत.”

तर मंडळी, असे अभ्यास हे अधूनमधून होतच असतात. तुम्हाला काय वाटतं हे वैज्ञानिक मंडळी जे सांगतायत ते खरं असावं का ? आपल्या दाढीवाल्या मित्रांना tag करायला विसरू नका !!

 

 

आणखी वाचा :

तुमच्या 'बियर्ड' लुकसाठी १३ झक्कास आयडियाज !!

सबस्क्राईब करा

* indicates required