computer

तुमच्या 'बियर्ड' लुकसाठी १३ झक्कास आयडियाज !!

मंडळी, एक काळ होता जेव्हा सिनेमातले हिरो तुकतुकीत म्हणजेच 'सटासट' दाढी केलेले दिसायचे. सिनेमापासून ते सामान्य लोकांपर्यंत दाढी मिशा ठेवण्याची पद्धत फारशी नव्हती. हिरोला जेव्हा एखाद्या सिनेमात दाढी यायची, तेव्हा एकतर त्याचा प्रेमभंग झालेला असायचा किंवा तो कंगाल झालेला असायचा किंवा आणखी काही कारण असायचं. पण दाढी मिशा ठेवलेला हिरो फारसा कधी दिसला नाही.

पण आता जमाना बदलला आहे. लोकांमध्ये दाढी ठेवण्याची पद्धत सुरु झाली आहे. यालाच हल्लीचा ‘सेक्सी लुक’ म्हणतात. भरगच्च दाढी आणि मिशा ही पद्धत जशी प्रसिद्ध होत चालली आहे, तशीच त्याची स्टाईल कशी असावी याचेसुद्धा अनेक पर्याय तयार झालेत.

मंडळी, आज आम्ही तुम्हाला तुमच्या बियर्ड लुकसाठी झक्कास अशा १३ आयडियाज देणार आहोत. यातली तुम्हाला कोणती आवडते ते बघा!!

१३. वॅन डायक

अँथनी वॅन डायक या प्रसिद्ध चित्रकाराच्या लुकवरून ही स्टाईल तयार झाली. या प्रकारात मिशा आणि दाढीचा भाग वेगवेगळा केलेला असतो. या फोटोत त्याचं उदाहरण दिसत आहे.

१२. लॉंग स्टबल

६ मिलीमीटरपर्यंत वाढलेली दाढी हा लॉंग स्टबल या प्रकारात मोडतो. मिडीयम स्टबलपेक्षा जास्त असला तरी याला फुल बियर्ड म्हणता येणार नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपला विराट कोहली!!

११. मिडीयम स्टबल

शॉर्ट स्टबलमध्ये जेवढी दाढी आणि मिशी ठेवली जाते, त्यापेक्षा किंचित जास्त वाढवून मिडीयम स्टबल तयार होतो. तुम्ही वरील चित्रात याचं उदाहरण बघू शकता.

१०. शॉर्ट स्टबल

दाढी आणि मिशी ट्रीम करून तुम्ही हा लुक मिळवू शकता. शॉर्ट स्टबल सर्वात सोप्पी स्टाईल आहे. यात तुमची दाढी भरगच्च ठेवावी लागत नाही, उलट कमीत कमी ठेवली असेल, तरच शॉर्ट स्टबल लुक मिळतो. रणबीर कपूर या प्रकारच्या स्टाईलमध्ये अनेकदा दिसून येतो.

९. इम्पिरीयल

या स्टाईलमध्ये दाढीपेक्षा मिशांना जास्त महत्व असतं. रणवीरचा बाजीराव लुकमधल्या पिळदार मिशा आणि खाली उभट दाढी जमली की इम्पेरीयाल लुक तयार!!

८. गॅरीबाल्डी

इटलीच्या इतिहासातील महत्वाची क्रांतिकारी व्यक्ती ‘गॅरीबाल्डी’ यांच्यावरून या स्टाईल ला नाव मिळालं का? याला उत्तर नाही, पण ही स्टाईल बॅनडोल्ज स्टाईलचं छोटं व्हर्जन आहे एवढं मात्र खरं.

७. फुल बियर्ड

याबद्दल काय सांगणार?  यासाठी ‘गब्बर इज बॅक’ मधला अक्षय कुमारचा लुक हे उत्तम उदाहरण असू शकतं.

६. फ्रेंडली मटन चॉप्स

मटण चॉप्स म्हणजे शुद्ध मराठीत कल्ले. या कल्ल्यांची फॅशन खूप पूर्वी व्हिलनमध्ये असे, आता मात्र ही पुन्हा लोकप्रिय होतेय.

फ्रेंडली मटन चॉप्सचं उत्तम उदाहरण आहे ‘एक्स मॅन’ मधला ‘वूल्वरीन’ भाऊ!!

५. एक्स्टेंडेड गोटी

सिक्रेट सुपरस्टारमधला आमीरचा लुक बघितला का? त्या लुकला एक्स्टेंडेड गोटी म्हणतात.

४. सर्कल बियर्ड

दाढी आणि मिश्यांना गोलाकार आकार देऊन त्यांना आपल्या व्यक्तिमत्वाबरोबर साजेसं रूप देण्यासाठी हा एक मस्त ऑप्शन असू शकतो. म्हणजे दाढी पूर्ण कापण्याची कटकट नाही!!

३. क्लीन शेव्ह!!

तुम्ही जर नोकरी धंद्याला असाल तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला भरगच्च दाढी ठेऊन चालत नाही. अशा लोकांसाठी ‘क्लीन शेव्ह’ हा एकच पर्याय उरतो!

२. बॅनडोल्ज

‘एरिक बॅनडोल्ज’ नावाच्या तरुणावरून या स्टाईलला बॅनडोल्ज नाव देण्यात आलं आहे. हा माणूस दाढीच्या प्रेमात आहे असं आपण म्हणू शकतो. एरिकने आपली नोकरी सोडून ‘Beardbrand’ ही कंपनी सुरु केली. ही कंपनी दाढी आणि मिशांना स्टायलिश लुक देणारे प्रोडक्ट्स विकते. याच दरम्यान त्याचा स्वतःचा बियार्ड लुक जगभर प्रसिद्ध झाला आहे.

१. बल्बो

याला ‘आयर्न मॅन’चा लुक म्हणू शकतो. आयर्न मॅनचा रोल साकारणारा ‘रोबर्ट डॉनी जुनियर’ याचा अॅव्हेन्जर्स सिनेमातल्या लुकला ’बल्बो’ असं म्हणतात.

 

मंडळी, या सर्व बियर्ड स्टाईल्स तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार ठरतात. तुमचा चेहरा आणि दाढी यावरून तुम्ही यातील कोणताही प्रकार अजमावू शकता.

एक विशेष सूचना :

ज्यांना दाढी येऊ शकत नाही त्यांनी निमुटपणे आपल्या बाकीच्या मित्रांना ही पोस्ट शेअर करावी. धन्यवाद !!

सबस्क्राईब करा

* indicates required