computer

ब्रीमॅटो: भारतीय शेती संशोधन मंडळाचं संशोधन!! एकाच झाडावर येणार टोमॅटो आणि वांगेसुद्धा!!

देशातील शेती क्षेत्र कमी झाल्याने कमीत कमी जागेत जास्तीत जास्त पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. म्हणून एकाच शेतात अनेक पिकपद्धती वापरुन मोठ्या पिकांसोबत फळभाज्या, पालेभाज्या सोबतच वेलवर्गीय भाज्यादेखील घेतल्या जातात. पण या सगळ्याच आपसात कसा मेळ बसेल? यावर त्याचे पीक किती येईल आणि त्यातून किती फायदा होईल हे ठरते. यात कष्टही खूप आहेत, वेगवेगळ्या बियाणांची पेरणी करणे ज्या-त्या पिकाच्या गरजेनुसार त्याला पाणी, खत, वगैरे द्यावे लागेल. एकाच क्षेत्रात अनेक पिकं घेतली तरी त्यासोबत कष्ट कमी होतीलच असे नाही. मग याला काही पर्याय देता येणार नाही का? समजा एकाच झाडावर दोन प्रकारच्या भाज्या लागल्या तर? म्हणजे एकाच झाडाला टोमॅटो आणि वांगी लागली तर? नाही, नाही, आम्ही इथे वांगी आणि टोमॅटोच्या हायब्रिडीकरणा बद्दल बोलत नाही, तर एकाच झाडाला टोमॅटोसारखा टोमॅटो आणि वांग्यासारखंच वांग लागलं तर? तर काय हे फक्त कल्पनेतच शक्य आहे. असच तुमचं उत्तर असेल पण आता शास्त्रज्ञांनी कल्पनेतील ही शक्यता वास्तवात उतरवली आहे.

भारतीय शेती संशोधन मंडळाच्या भाजी संशोधन मंडळाने हा नाव प्रयोग केला आहे. ज्यामध्ये एकाच झाडावर वांगी आणि टोमॅटोचे पीक घेत येईल अशा रोपाचे संशोधन केले आहे. वांगे आणि टोमॅटोच्या रोपांचे कलम करून त्यांनी ही नवे रोप बनवले आहे. महत्वाचे म्हणजे या रोपवर दोन्ही प्रकारच्या भाज्यांची मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळते.

यापद्धतीचे रोप तयार करण्यासाठी एकाच जातीच्या रोपांची निवड करावी लागते. यासाठी टोमॅटोचे २२ दिवसांचे रोप आणि वांग्याचे २५ दिवसांचे रोप निवडण्यात आले. कलम पद्धतीने दोन्ही रोपे एकमेकांशी जोडल्यानंतर त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत ही रोपे प्रयोगशाळेत देखरेखी खाली ठेवण्यात आली. पंधरा दिवसानंतर या रोपांची शेतात लागवड करण्यात आली. या ब्रीमॅटोच्या या रोपातून २.३ किलो टोमॅटो आणि ३.४ किलो वांग्याचे उत्पादन मिळाले आहे.
जिथे शेतजमिनीची कमतरता आहे, अशा दाट लोकवस्तीच्या शहरातून याप्रकारच्या रोपांची लागवड केल्यास एकाच वेळी दोन-दोन प्रकारच्या भाज्या तेही कमी जागेत पिकविणे शक्य आहे.

हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत लवकर पोहोचेल का? आणि त्याचा वापर वाढेल का? असेही काही मुद्दे आहेतच. तर शास्त्रज्ञांनी शोधलेल्या या नवीन प्रकारच्या रोपांचा शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही कितपत फायदा होईल असे तुम्हाला वाटते? कमेंटच्या मध्यमातून नक्की सांगा.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required