काय म्हणता? या लोकांना कधीच एड्स होऊ शकणार नाही?? कसं काय शक्य झालं हे?

काही दिवसांवर जागतिक एड्स दिन येऊन ठेपला आहे, त्याच पार्श्वभूमीवर नुकतीच एक चांगली बातमी आली आहे. चीनच्या एका वैज्ञानिकाने असे भ्रूण तयार केले आहेत ज्यांना कधीही एचआयव्हीची लागण होणार नाही आणि त्यांना एड्स रोगाची बाधा होणार नाही. विशिष्ट जनुकीय बदल केलेल्या लुलू आणि नाना नावाच्या जुळ्यांचा नुकताच जन्म झाला आहे. हे कसं शक्य झालं ? हे तंत्रज्ञान आहे तरी काय ? चला तर सविस्तर जाणून घेऊया !!

स्रोत

एड्स सारख्या रोगावर आजही पूर्णपणे मात होऊ शकलेली नाही. यादृष्टीने शास्त्रज्ञ ‘हे जायंकू’ यांनी एक क्रांतिकारक शोध लावला आहे. त्यांनी यासाठी DNA मध्ये बदल करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या CRISPR या तंत्रज्ञानाचा वापर केला. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांनी सेल्युलर सर्जरीने काही विशिष्ट प्रथिने भ्रुणाच्या शरीरात इंजेक्ट केली.

मंडळी, ‘जायंकू’ यांनी हा प्रयोग ७ जोडप्यांवर केला होता त्यातील फक्त एका जोडप्याच्या बाबतीत हे यश आलं आहे. यासाठी त्यांनी IVF तंत्रज्ञानाचा वापर केला होता.

स्रोत

CRISPR तंत्रज्ञानाबद्दल काही वादही आहेत, पण ‘जायंकू’ यांचा प्रयोग यशस्वी झाला आहे हे परीक्षणातून सिद्ध झालंय. अर्थतच हा प्रयोग कितपत यशस्वी होता हे भविष्यच सांगेल. जर हा प्रयोग यशस्वी ठरला तर भविष्यात CRISPR तंत्रज्ञानाच्या सहाय्याने इतर अनेक रोगांवर मात करता येईल. CRISPR तंत्रज्ञान  मेसेज कॉपी अँड पेस्ट करण्या इतक्या सोप्या पद्धतीने DNA मध्ये बदल करू शकतं.

स्रोत

मंडळी, भविष्यात DNA मध्ये बदल असलेली नवी पिढी तयार होऊ शकते. आजवर विज्ञान कथा आणि हॉलीवूडच्या सिनेमांमध्ये पाहिलेला सुपरह्युमन हा प्रकार आता फार लांब नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required