क्रिकेट मधील दिग्गज आहेत या पदार्थांच्या प्रेमात...पाहा बरं कोणत्या क्रिकेटरला कोणता पदार्थ आवडतो ते !!

मंडळी आपल्या देशात क्रिकेट खेळाडूंना सेलेब्रिटी दर्जा दिला जातो. ते कसे राहतात, बोलतात त्याची सर्वांनाच उत्सुकता असते. एवढंच काय तर त्यांना कुठल्या वस्तू आवडतात त्याप्रमाणे त्यांचे फॅन देखील तशाच वस्तू वापरतात. आणखी एक कुतूहलाचा विषय म्हणजे क्रिकेटर्सना कोणते खाद्यपदार्थ आवडतात हा. चला तर मग जाणून घेऊ कोणता क्रिकेटर काय खाणे पसंत करतो…
कॅरेबियन खेळाडू क्रिस गेल फक्त त्याच्या देशातच नाही तर भारतात सुद्धा सर्वांचा आवडता खेळाडू आहे. आयपीएल मॅचेस मध्ये त्याला भरपूर प्रेम मिळाले. तर अशा या आपल्या क्रिस भाऊला सी फूड जास्त आवडतं. मिठात खारवलेले मासे त्याला अतिशय प्रिय आहेत. भारतीय व्यंजनामध्ये खिमा आणि बिर्याणी आवडीचे पदार्थ!
जेव्हा कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीची गोष्ट येते तेव्हा सगळ्यांनाच त्याच्या आवडीचे पदार्थ कोणते हे जाणून घ्यायची उत्सुकता असते. आपल्या विशिष्ट शैलीने डोळ्यांचे पारणे फेडणारा धोनी जेवणात कबाब, बटर चिकन, नान आणि चिकन टिक्का पिझ्झा पसंत करतो.
रिटायर झालेला कॅप्टन विरु अर्थात वीरेंद्र सेहवाग बिर्याणीचा दिवाना आहे. 2011 मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला तेव्हा मध्यरात्री सर्व मित्रांसोबत भरपूर बिर्याणी खाऊन त्याने आनंद साजरा केला होता.
ऑस्ट्रेलियाचा लेजेंडरी स्पिनर शेन वोर्नला स्पागेटी आणि बेक्ड बीन्स जास्त आवडतात. पाकिस्तानी हार्ड हिटर शाहिद आफ्रिदीला चिकन बिर्याणी, पनीर टिक्का, खीर आणि आईसक्रीम हे पदार्थ विशेष प्रिय आहेत.
आपला सर्वांचा लाडका द वॉल, म्हणजेच राहुल द्रविड जितका साधा वागतो तितकेच साधे जेवण पसंत करतो. घरी शिजवलेले अन्न त्याला जास्त आवडते. मात्र आठवड्यातून एकदा बटर क्रॅब खाणे ही त्याची विशेष आवड आहे.
डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला कबाब आवडतात. रोहित शर्माला आलू पराठा जास्त प्रिय आहे. पण आता फिटनेस तज्ज्ञांनी त्याला कार्बोहायड्रेट्स असलेल्या पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. बघूया हा सल्ला तो कितपत मानतो.
मुलींचा हार्टथ्रोब विराट कोहली हा फिटनेसवर जास्त लक्ष देतो. त्याला जपानी डिश ‘सुशी’ अत्यंत प्रिय आहे. सुशिमध्ये व्हिनेगर राईस, सीफूड, भाज्या आणि फळे समाविष्ट असतात. मात्र लग्न झाल्यापासून तो शाकाहाराकडे वळलाय. त्याच्या पत्नीच्या, अनुष्का शर्माच्या सांगण्यावरून तो आता नॉनव्हेज आणि दुग्धजन्य पदार्थ टाळतो. सध्या त्याचे अन्न प्रोटीन शेक, सोया आणि भाज्या असे आहे.
आता बघूया आपल्या सर्वांचा आवडता आणि क्रिकेट जगताचा बादशहा सचिन तेंडुलकर काय खाण्याला प्राधान्य देतो.
सचिन आढेवेढे न घेता सरळ सांगतो की तो अजिबात हेल्थ कॉन्शस व्यक्ती नाही. त्याला अनेक वेगवेगळ्या डिश आवडतात. खिमा पराठा, लस्सी, प्रॉन मसाला आणि जपानी डिश सुशी आणि साहिनी हे त्याचे आवडते पदार्थ आहेत.
भारतीय टेस्ट ओपनर मुरली विजयला दाल भात पसंत आहे. ऑस्ट्रेलियन टेस्ट ओपनर डेविड वोर्नरला चिकन सँडविच, सलाड आणि मेयोनीज सॉस प्रिय आहे.
युवराज सिंग मात्र आपला फिटनेस आणि तब्येत याबाबत अतिशय काटेकोर आहे. त्याला चायनीज पदार्थ अजिबात आवडत नाहीत. कॉन्टिनेंटल डिश आणि भारतीय पदार्थात मटार पनीर, कढी चावल हे त्याचे आवडते पदार्थ.
आर. अश्विन पक्का शाकाहारी माणूस! त्याला त्याच्या आईने बनवलेली सिमला पनीर भाजी सोडून इतर काही आवडत नाही. हरभजन सिंग मात्र इतर पंजाबी लोकांसारखा आलू पराठा, दही, लोणचे आणि पुदिन्याच्या चटणीवर भरपूर ताव मारतो.
गौतम गंभीरला राजमा चावल आवडतात तर इरफान पठाणला दम बिर्याणी आवडते. श्रीलंकन खेळाडू कुमार संगकाराला मासे आणि भात सोडून बाकी कशातच रस वाटत नाही.
आपला बंगाली दादा सौरव गांगुली अर्थातच बंगाली खाण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. त्याला रॉयल बिर्याणी जास्त प्रिय आहे. सोबत आलू पोश्तो, चिंगारी माछेर मलईकरी या बंगाली डिश त्याच्या विशेष आवडीच्या.
तर मंडळी क्रिकेटमधील हे दिग्गज लोक आपल्यासारखेच खाण्याचे शौकीन असतात हे तर समजलं असेलच. पण ते खाण्यासोबत स्वतःच्या तब्येतीची आणि फिटनेसची सुद्धा आवर्जून काळजी घेतात बरं का.
हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून जरूर कळवा.
आणखी वाचा :
क्रिकेटच्या इतिहासातील धोनीचे १० अफलातून रेकॉर्ड्स !!
एबी डिव्हिलिअर्स बद्दल या ७ गोष्टी वाचून तुम्ही त्याला सलाम ठोकाल !!
#शास्त्री_जीवनव्यवहारशास्त्र : भाऊ रवी शास्त्री नक्कीच काहीही शिकवू शकतात, हे meme नक्कीच बघा
भारताला मिळाली पहिली महिला अंपायर....जाणून घ्या तिच्या जिद्दीची गोष्ट !!
हा मराठी तरुण बनलाय अमेरिकेच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन....वाचा त्याची यशोगाथा !!
बॅट्समनचा स्विच हिट तुम्ही पाहिला असेल, पण आज स्पीच बॉलिंग लगेच बघून घ्या...