computer

एबी डिव्हिलिअर्स बद्दल या ७ गोष्टी वाचून तुम्ही त्याला सलाम ठोकाल !!

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलिअर्सने काल धक्कादायक निर्णय घेतला राव. त्याने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. या घोषणेने साऱ्या क्रिकेट रसिकांना प्रचंड मोठा धक्का बसला. त्याचे जितके चाहते दक्षिण आफ्रिकेत नसतील त्यापेक्षा जास्त भारतात आहेत. त्याने भारताविरुद्ध अनेकदा सामने खेळले असले तरी तो भारतीयांचा लाडका ठरलेला आहे.

त्याने निवृत्तीच्या निर्णयावर ‘आपण आता थकलोय’ असं स्पष्टीकरण दिलं असलं तरी ते फारसं कोणाला रुचलेलं नाही. त्याने नुकतीच आयपीएलच्या सामन्यात जी अफलातून कामगिरी केली त्यावरून तो कुठूनही थकलेला वाटत नाही.

मंडळी, काहीही असलं तरी आपला लाडका मिस्टर ३६० आता क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून  निवृत्त होतोय. त्याची झंझावाती कामगिरी आपल्या सगळ्यांच्याच लक्षात राहील.

चला तर मंडळी आज या निमित्ताने क्रिकेटच्या विश्वात अविस्मरणीय ठरलेल्या एबी डिव्हिलिअर्स बद्दल १० रंजक गोष्टी जाणून घेऊया.

१. आपण जरी एबी डिव्हिलिअर्सला क्रिकेटर म्हणून ओळखत असलो तरी त्याने इतर खेळांमध्ये सुद्धा आपली चमक दाखवली आहे. त्याच्या इतर खेळांमधली कामगिरी बघून तो खऱ्या आयुष्यातही मिस्टर ३६० होता यावर विश्वास बसतो.

२. त्याची निवड झालेले इतर खेळ :

१. राष्ट्रीय ज्युनियर हॉकी संघात शॉर्टलिस्टेड
२. राष्ट्रीय ज्युनियर फुटबॉल संघात शॉर्टलिस्टेड
३. ज्युनियर रग्बी संघाचा कॅप्टन
४. दक्षिण आफ्रिकाच्या ज्युनियर डेव्हिस कप जिंकणाऱ्या टेनिस टीमचा सदस्य
५. अंडर-19 बॅडमिंटन गटातील चॅम्पियन
६. गोल्फ मधला चॅम्पियन

३. याशिवाय पोहण्याचे तब्बल सहा शालेय विक्रम डीव्हिलियर्सच्या नावावर आहेत.

४. शाळेत असताना त्याने ज्युनियर लेवल १०० मीटर शर्यतीत दक्षिण आफ्रिकेचा सर्वाधिक वेगवान धावपटू होण्याचा मान मिळवला आहे.

५. एवढ्या खेळात तरबेज असलेला एबी डीव्हिलियर्स अभ्यासात मागे असेल असं तुम्हाला वाटत असेल ना ? राव तुमचा अंदाज चुकीचा आहे. त्याला एका विज्ञान प्रयोगासाठी नेल्सन मंडेला यांच्या हस्ते पदक मिळालं होतं.

६. राव त्याच्या कामांची लिस्ट इथेच थांबत नाही. तो उत्तम गिटार वाजवतो, तो संगीतकार आहे, गीतकार आहे. २०१० साली त्याचा अल्बम रिलीज झाला होता.

७. त्याच्या क्रिकेट मधल्या झंजावाती कामगिरीवर एक नजर टाकू :

१. अवघ्या ४० मिनिटांत १०० धावा
२. १६ चेंडूत ६० धावा
३. एकदिवसीय सामन्यांतील सर्वात जलद ५०, १०० आणि १५० धावा
४. वनडेतील ३३८.६३ हा सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेला खेळाडू
५. एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू म्हणून रोहित शर्मा बरोबर एबी डीव्हिलियर्सचं नाव घेतलं जातं.

 

राव, त्याच्या कामगिरीकडे बघून प्रश्न पडतो, ‘याला न जमण्यासारखं या जगात काही आहे का ?’. राव या अष्टपैलू खेळाडूला बोभाटाचा सलाम !!

सबस्क्राईब करा

* indicates required