या बेटावर तब्बल १२ वर्षांनंतर जन्मलंय मूल !! वाचा इथं मुलांना जन्म देण्यावर का बंदी आहे ते !

मंडळी, एखाद्या दाम्पत्याला अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुल झालेलं आपण ऐकलं असेल पण कधी एखाद्या ठिकाणी तब्बल १२ वर्षांनी मुल जन्मलेलं ऐकलं आहे का ? राव, ब्राझील मध्ये हे खरोखर घडलं आहे.

ब्राझील मधल्या ‘फर्नान्डो द नोरोन्हा’ या बेटावर एक अजब कायदा आहे. या बेटावर चक्क मुलांना जन्म देण्यास बंदी आहे. असं म्हणतात बेटावरच्या पर्यावरणाला धक्का पोहोचू नये म्हणून लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा केला गेलाय.

स्रोत

२२ वर्षीय एका मुलीने हा नियम तोडला आहे. तिने नाव न उघड करण्याच्या अटीवर मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने म्हटलं ‘मी गर्भवती आहे हे मला माहित नव्हतं.’ ती घरात असताना तिच्या पोटात दुखू लागलं. ती बाथरूम मध्ये गेली असता तिथेच तिने मुलीला जन्म दिला. या जन्माने तब्बल १२ वर्षांनी या बेटाने एक नवीन जन्म पहिला आहे.

मंडळी, फर्नान्डो बेटाची लोकसंख्या ३००० आहे पण आश्चर्य म्हणजे इथे एकही प्रसूती गृह नाही. मुलांना जन्म देण्यासाठी बेटापासून ३७० किलोमीटर वर असलेल्या शहरात जावं लागतं. या नवीन जन्माने इथले लोक मात्र जल्लोषात आहेत. नवजात मुलीसाठी कपडे आणि खेळणी गिफ्ट केली जातायत.

स्रोत

‘फर्नान्डो द नोरोन्हा’ हे बेट अनेक दुर्मिळ प्राण्यांचं घर आहे. दुर्मिळ जातीचे समुद्री कासव, व्हेल्स, डॉल्फिन्स इत्यादी जीव इथे आढळतात. जगातल्यामोजक्या अप्रतिम बेटांमध्ये ‘फर्नान्डो द नोरोन्हा’चा समावेश होतो. या सर्व दुर्मिळ गोष्टींना जपण्यासाठी इथले कायदे अत्यंत कठोर करण्यात आले आहेत.

पण राव, हे म्हणजे निसर्गाला वाचवण्यासाठी नैसर्गिक क्रियेवर बंदी घालण्यासारखं झालं नाही का ?

 

आणखी वाचा :

हे आहेत जगातले ५ अत्यंत दुर्गम भाग....तुम्ही कुठल्या दुर्गम भागात जाऊ शकता ?

 

सबस्क्राईब करा

* indicates required