मराठी पाऊल पडते पुढे : मराठी माणसाने लावला सर्वात लहान वायरलेस रोबोचा शोध !!

Subscribe to Bobhata

राव प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी एक गोष्ट घडली आहे. जगातील पहिल्या सर्वात लहान वायरलेस उडणाऱ्या रोबोचा शोध एका मराठी माणसाने लावला आहे राव. योगेश चुकेवाड आणि त्याच्या टीमने हा शोध लावला आहेत. या रोबॉटचं नाव आहे रोबोफ्लाय. त्याच्या लहानशा आकाराला हे नाव अगदी साजेसं वाटतं. चला योगेश बद्दल आणि त्याच्या शोधाविषयी आणखी जाणून घेऊया.

रोबोफ्लाय विषयी थोडक्यात !!

स्रोत

रोबोफ्लायचा आकार चक्क पेन्सिलच्या टोकाएवढा असून त्याचं वजन फक्त १९० मिलिग्राम आहे. रोबोफ्लाय दिसायला एखाद्या किटकासारखा दिसतो. त्याला उडण्यासाठी किटकासारखेच पंख देण्यात आलेत. रोबोफ्लायला वीजपुरवठा करण्यासाठी अगदी लहान आकारातील ऑन बोर्ड सर्किटचा वापर केला जातो. हे ऑन बोर्ड सर्किट लेसर एनर्जीचं रुपांतर विजेत करतं. या सर्किटवरचा मायक्रोकंट्रोलर हा रोबोफ्लायच्या मेंदूचं काम करतो. मायक्रोकंट्रोलरद्वारे पंखांची हालचाल नियंत्रित केली जाते.

या रोबोफ्लायचा वापर वायू गळती आणि मोठ्या शेतातील पिकांच्या देखभालीसाठी होऊ शकतो असं योगेशचं म्हणणं आहे. भविष्यात रोबोफ्लायमुळे वेळेची मोठी बचत होईल.

 

कोण आहे योगेश चुकेवाड ?

स्रोत

योगेश चुकेवाड हा मुळचा नांदेडचा असून तो सध्या अमेरिकेत संशोधक म्हणून काम करत आहे. त्याचे वडील माधव चुकेवाड हे भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी व ज्येष्ठ बालसाहित्यिक होते. योगेशने आयआयटी-पवई येथे बी. टेक व अमेरिकेत एम. एस. केल्यानंतर संशोधक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

योगेश आणि त्याची टीम आपलं संशोधन आज  ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रोबोटिक्स अ‍ॅण्ड ऑटोमेशन’ येथे सदर करणार आहेत. या सादरीकरणापूर्वीच किरो-७ या अमेरिकन टीव्ही वाहिनीवरून त्याचं यशस्वी प्रक्षेपण दाखवण्यात आलं होतं. राव, रोबोटिक्स मध्ये ही एक मोठी क्रांती म्हणता येईल.

मंडळी, अशा प्रकारचा रोबो आजवर फक्त विज्ञान कथांमध्ये पाहायला मिळायचा पण आता तो प्रत्यक्षात साकार झाला आहे. या शोधात महाराष्ट्राच्या मातीतल्या वैज्ञानिकाचा समावेश असल्याने त्याचा आनंद द्विगुणित झाला आहे.

 

आणखी वाचा :

एका देशाचं नागरिकत्व मिळवणारी पहिली रोबो, पण AI म्हणजे काय? जाणून घ्या तिची पूर्ण कहाणी...

कार्यकर्ते मंडळी, तयारीला लागा... निर्माण होतोय जगातला पहिलावहिला रोबोट राजकारणी

जपानमध्ये रोबोट चालवत आहेत एक पूर्ण हॉटेल...

सबस्क्राईब करा

* indicates required