computer

क्रिकेटच्या इतिहासातील धोनीचे १० अफलातून रेकॉर्ड्स !!

दाढीचे केस पांढरे झाल्यावर सुद्धा २० वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशा आक्रमकतेने खेळणारा, चित्त्यासारखी झडप असलेला विकेट-कीपर, मुंबईच्या पावसासारखा बॉलरला झोडपून काढणारा बॅट्समन आणि बाजी प्रभू सारखा शेवटपर्यंत खिंड लढवणार कॅप्टन आणि वेळीच कॅप्टनपद सोडून नव्या दमाच्या कॅप्टनच्या हाती सूत्रे सोपवून त्याचा सतत पाठीराखा म्हणून काम करणाऱ्या आपल्या लाडक्या महेंद्रसिंह धोनीचा आज वाढदिवस. यानिमित्ताने बघूया त्याने रचलेले ११ अफलातून विक्रम !!

१. धोनीच्या कॅप्टन्सी मध्ये भारताने ७० ODI सामने खेळले असून त्यातील ४१ सामने जिंकले आहेत. धोनीने कॅप्टन म्हणून सर्वात जास्त सामने जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे.

२. धोनी हा एकमेव कॅप्टन आहे ज्याने आपल्या टीमला ICC च्या तीनही महत्वाच्या स्पर्धांमध्ये विजय मिळवून दिला आहे. या तीन स्पर्धा म्हणजे T20 वर्ल्डकप (२००७), ICC क्रिकेट वर्ल्डकप २०११, चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३.

३. कार्डिफच्या T-20 मध्ये विम्बल्डनचे फोर-हँड वापरून चौकार ठोकणारा धोनी हा एकमेव बॅट्समन आहे.

(फोटो प्रातिनिधिक)

४. ७ व्या क्रमांकावर राहून २ वेळा सेन्चुरी ठोकणारा धोनी हा एकमेव खेळाडू आहे.

५. कॅप्टन म्हणून सर्वाधिक षटकार लगावण्याचा रेकोर्ड धोनीच्या नावे आहे. हा रेकॉर्ड तयार झाला तेव्हा त्याचे एकूण २०४ षटकार पूर्ण झाले होते.

६. धोनीच्या बॅटींग पेक्षा त्याची स्टंपींग जास्त प्रसिद्ध आहे. त्याने आजवर ४३९ सामन्यांमध्ये तब्बल १४८ वेळा स्टंपींग केली आहे.

७. एक विकेट-कीपर बॅट्समन म्हणून सर्वाधिक धावा करणारा धोनी हा एकमेव क्रिकेटर आहे. त्याने हा रेकॉर्ड २००५ साली श्रीलंके विरुद्ध १८३ स्कोर करून बनवला होता.

८. विकेट-कीपर म्हणून काम करत असूनही सर्वाधिक वेळा बॉलिंग (१३२ बॉल्स) करण्याचा रेकॉर्ड सुद्धा धोनीच्या नावे आहे.

९. धोनी हा एकमेव क्रिकेटर आहे ज्याने “ICC प्लेअर ऑफ द इयर अवॉर्ड” २ वेळा मिळवला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required