टॉप -४ फलंदाज ज्यांनी विंडीजविरुद्ध पाडला आहे धावांचा पाऊस; पाहा यादी..

इंग्लंड संघाला वनडे मालिकेत २-१ ने धूळ चारल्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ टी -२० आणि ५ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. वनडे मालिकेची सुरुवात ही २२ जुलै पासून होणार आहे. या मालिकेसाठी शिखर धवनला भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. तर रोहित शर्मा, रिषभ पंत, विराट कोहली आणि हार्दिक पंड्यासारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या मालिकेत धावांचा पाऊस पडणार यात काहीच शंका नाही. तत्पूर्वी आम्ही तुम्हाला वेस्ट इंडिज संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत.

) राहुल द्रविड (Rahul Dravid) :

या यादीत चौथ्या स्थानी आहे, भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज राहुल द्रविड. भारताचा 'द वॉल' म्हणून ओळखला जाणारा हा फलंदाज सध्या भारतीय संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडतोय. राहुल द्रविडने अनेक दिग्गज गोलंदाजांचा सामना केला आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध खेळताना धावा देखील केल्या आहेत. तसेच वेस्ट इंडिज संघाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने या संघाविरुद्ध खेळताना ४२.१२ च्या सरासरीने १३४८ धावा केल्या आहेत.

) रोहित शर्मा (Rohit Sharma) :

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. तो वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा तिसरा भारतीय फलंदाज आहे. रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना ६०.९२ च्या सरासरीने एकूण १५२३ धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. तो टी -२० मालिकेत पुनरागमन करणार आहे.

) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) :

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावे अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद आहे. तसेच वेस्ट इंडिज विरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानी आहे. सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिज संघाविरुद्ध धावांचा पाऊस पाडत ५२.४३ च्या सरासरीने १५७३ धावा केल्या आहेत. 

) विराट कोहली (Virat Kohli) :

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि रन मशीन ओळखला जाणारा विराट कोहली या यादीत पहिल्या स्थानी आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. अडीच वर्षे होऊन गेले तरीदेखील त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये. मात्र वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो अव्वल स्थानी आहे. त्याने ७२.०९ च्या सरासरीने २२३५ धावा केल्या आहेत.

काय वाटतं? रोहित शर्मा हा विराट कोहलीचा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडून काढू शकतो का?

सबस्क्राईब करा

* indicates required