computer

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिनाच्या निमित्ताने दुर्बिणीशिवाय उघड्या डोळ्यांनी उपग्रह पाहण्याची पद्धत शिकून घ्या !!

आज १५ मे म्हणजे 'जागतिक खगोलशास्त्र दिवस'. या दिवसाची सुरुवात १९७३ साली डॉ. डग बर्जर यांनी केली. सर्वसामान्य लोकांच्या मनात अवकाशाबद्दल, आपल्या अनंत विश्वाबद्दल कुतुहूल निर्माण करून त्यांना जास्तीतजास्त माहीती द्यावी असा या यामागचा उद्देश आहे. फरक इतकाच आहे की जागतिक खगोलशास्त्र दिवस दरवर्षी दोनदा साजरा केला जातो. एकदा एप्रिल आणि मेच्या मध्यात तर दुसर्‍यांदा सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या मध्यकाळात. तर या वर्षीचा दुसरा खगोलशास्त्र दिन ९ ऑक्टोबर २०२१ रोजी असेल. गेल्या वर्षी हाच 'जागतिक खगोलशास्त्र दिवस' २ मे रोजी होता आणि यावर्षी तो १५ मे रोजी का आहे याचा उलगडा आधी करून घेऊ या. हा दिवस शुक्ल पंधरवड्याच्या म्हणजे अमावस्या ते पौर्णिमा या तिथींच्या दरम्यान पहिल्या सप्ताहात साजरा केला जातो म्हणून या तारखा बदलतात.

बोभाटाचा  २०२०चा खगोलशास्त्राचा विशेष लेख इथे वाचायला मिळेल.

चला तर आज बोभाटाच्या माध्यमातून आपणही साजरा करू जागतिक खगोलशास्त्र दिन ! 

नुकतेच चीनचे एक रॉकेट अवकाशातून भरकटत मालदीव जवळ कोसळले. हा प्रसंग मनात ताजा असताना असाही प्रश्न मनात आला असेल की ही अंतराळातील स्पेस स्टेशन- कृत्रीम उपग्रह आकाशात दिसतात का? ग्रह तारे हे प्रचंड मोठे असतात त्यामुळे ते आपण आपल्या नजरेने बघू शकतो. ही स्पेस स्टेशन आणि उपग्रह त्यामानाने चिमुकलीच म्हणायला हवीत. त्यामुळे ती कदाचित नजरेस येतच नसतील. पण तसे नाही. ही स्पेस स्टेशन आणि उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत जवळच्याअंतरावर असतात. त्यामुळेच ती बघायला दुर्बिणीचीही गरज भासत नाहीत. आकाश निरभ्र असेल आणि वेळ नक्की माहिती असेल तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी हे उपग्रह आकाशात बघू शकाल. 

यासाठी तुम्हाला एका संकेतस्थळाची मदत घ्यावी लागेल. https://james.darpinian.com/satellites/ या संकेतस्थळावर तुमच्या आकाशात किती वाजता कोणता उपग्रह बघायला मिळेल याची माहिती मिळेल. या संकेतस्थळावर जा. तुमचे 'लोकेशन' टाका. आज आणि पुढच्या दोन दिवसात रात्री तुम्ही कोणते उपग्रह बघू शकाल याची यादी उजव्या बाजूच्या कॉलममध्ये वाचायला मिळेल. जे उपग्रह दिसणार आहेत त्याचे 'व्हिज्युअल' पण सोबत बघायला मिळेल. इतकेच नाही तर 'रिमाइंडर' पण टाकता येईल, ज्यामुळे वेळेआधी तुम्हाला सूचना मिळेल. आज आणि उद्या तुम्हाला स्टार लिंक या सिरीजच्या अनेक उपग्रहांची माळ बघायला मिळेल. आज महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी वादळी ढग आहेत त्यामुळे कदाचित संधी हुकेल. पण इतर कोणत्याही दिवशी तुम्ही आकाश दर्शन करून हा आनंद मिळवू शकाल.

स्टार लिंक उपग्रह पाहण्याच्या वेळा

आज रात्री ७.५५ वाजता

आज रात्री ८.१७

 

जर हे सॅटेलाइट तुम्ही बघू शकलात तर आम्हाला नक्कीच कळवा !!

सबस्क्राईब करा

* indicates required