नासाने विक्रम लँडरचे अवशेष शोधून काढल्याचा दावा केलाय!! इस्रोने काय उत्तर दिलं पाहा !!

नुकताच नासाने असा दावा केला आहे की त्यांनी विक्रम लँडरचे अवशेष शोधून काढले आहेत. या कामात त्यांना चेन्नईचे आयटीचे प्राध्यापक षण्मुग ‘शान’ सुब्रमण्यम यांनी मदत केली. षण्मुग यांनी रोज ७ ते८ तास खपून हा शोध लावला असल्याचं म्हटलं जातंय...पण मुळात नासाने केलेल्या दाव्यात किती सत्यता आहे ?

आता नासा म्हणत असेल तर ते खरंच असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर थोडं थांबा. नासाच्या दाव्यावर इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी सांगितलंय की इस्रोने हे काम फार पूर्वीच केलं आहे.

मंडळी, तुम्हाला आठवत असेल तर इस्रोने सप्टेंबर मध्ये एक ट्विट करून माहिती दिली होती की विक्रम लँडरला शोधण्यात यश आलेलं आहे, पण त्याच्याशी अजून तरी संपर्क झालेला नाही. हे पाहा ते ट्विट...

नासाने म्हटलं आहे की त्यांनी षण्मुग यांच्या मदतीने लँडिंगच्या जागेपासून ७०० मीटरच्या अंतरावर विक्रम लँडरचे अवशेष शोधून काढले आहेत.  पण वरील ट्विटवरून तर असं दिसत आहे की हे काम इस्रोने आधीच केलं आहे. मग नासाने नक्की कशाच्या जोरावर हा दावा केला असावा ?

सबस्क्राईब करा

* indicates required