इस्रो ने भारताच्या पहिल्या रियुजेबल स्पेस शटलची केली यशस्वी चाचणी

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ने आज श्रीहरीकोटा येथे भारतीय बनावटीच्या फेरवापराच्या प्रक्षेपक यानाची (रियुजेबल स्पेस शटल) यशस्वी चाचणी केली. या यानाचे नाव रियुजेबल लॉन्च वेहीकल (RLV) आहे. हे यान अवकाशात उपग्रह सोडून पृथ्वीच्या वातावरणात परतते. हे यान परत वापरता येणार असल्यामुळे उपग्रह सोडण्याचा खर्च हा 10 पटीने कमी होणार आहे. या यानाची अजून एक खासियत म्हणजे याचे वर्णन पंख असलेल यान असे करता येते. आजची चाचणी यशस्वी झाली असली तरी प्रत्येक्षात यानाचा निर्मितीत बराच काळ लागणार आहे.

वाचा: भारतीयांची मान अभिमानाने उंचावी अशा इस्त्रोच्या सहा मोठ्या कामगिर्‍या

 

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required