computer

किस्से नोबेलचे : नोबेल पुरस्कार मिळूनही स्वतः स्वीकारता न आलेला शास्त्रज्ञ!!

आजचा रशिया हा कधीकाळी सोवियत युनियन म्हणून ओळखला जात होता. या सोवियत युनियनचा एक फिजिक्स विषयावलतील शास्त्रज्ञ म्हणजे लिव लेंडावु!!! हे नाव विशेष परिचयाचे नाही. पण त्यांनी केलेले काम मात्र मोठे आहे. जेव्हा कधी मॅथेमॅटीकल थियरी ऑफ सुपरफ्ल्यूईडीलिटीचे नाव येते त्यावेळी त्याचे श्रेय हे लिव लेंडावु यांना जाते. 

लिव लेंडावु हे थिओरिटीकल फिजिसिस्ट होते. ज्यांना खूप कमी तापमानात लिक्विड हिलीयमच्या व्यवहारांच्या शोधासाठी नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. तसे लिव हे लहानपणापासून असामान्य होते, वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी आपले सर्व शिक्षण पूर्ण केले होते. 

लिव यांनी आयुष्यभरात अनेक शोध लावले. यात सेकंड ऑर्डर फेज डिस्ट्रक्शन, गिंजबर्ग-लेंडावु थेवरी ऑफ सुपरकंडक्टिव्हिटी, थिअरी ऑफ फर्मी लिक्विड यांसारख्या अनेक शोधांचा समावेश आहे. नोबेलसहित त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यात, स्टालिन पुरस्कार, मॅक्स प्लॅंक मेडल यांसारख्या पुरस्कारांचा समावेश आहे.

अशा या महान शास्त्रज्ञ लेंडावु यांचा अंत मात्र अतिशय वाईट झाला. १९६२ साली त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा आनंद साजरा करण्याचा देखील त्यांना वेळ मिळाला नाही. नोबेल मिळाल्यावर काहीच दिवसांत त्यांचा एक मोठा कार अपघात झाला. या अपघातात ते वारले नाहीत. पण दोन महिने ते कोमात होते. 

पुढे आजारी अवस्थेत त्यांनी सहा महिने काढले. त्यांचे शरीर फक्त एक जिवंत पुतळा झाले होते. आयुष्यभर मेहनत करून जो नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला. त्याचा आनंद सुद्धा साजरा करता न यावे यापेक्षा मोठे दुर्दैव काय असेल. लिव लेंडावु यांचे पुढे १९६८ साली निधन झाले. त्यांना जरी नोबेलचा आनंद साजरा करता आला नाही तरी त्यांच्या शोधांमुळे मानवी जीवन मात्र सुसह्य झाले हे देखील तेवढेच खरे...

सबस्क्राईब करा

* indicates required