या माकडांनी माणसाच्या पावलावर पाऊल ठेऊन काय कमाल केली आहे बघा

मंडली, इतिहासाच्या पुस्तकात आपण शिकलेलो असतो की पाषाणयुगात माणसाने दगडाचा वापर करून हत्यारे व दैनंदिन जिवनातील साधने तयार करण्यास सुरुवात केली. पाषाण युग हे माणसाच्या उत्क्रांतीतील महत्वाचा टप्पा होता. पुढे माणसाची उक्रांती होऊन आजच्या काळातला माणूस तयार झाला.

राव, ही तर झाली माणसाची गोष्ट. आज आम्ही एक निराळीच गोष्ट घेऊन आलो आहोत. सध्या पनामा मंकी या माकडाच्या प्रजातीने उत्क्रांतीच्या दिशेने एक पाऊल ठेवलं आहे. त्यांनी चक्क पाषाण युगाला सुरुवात केली आहे राव. पनामा बेटांवर हे माकड आढळतात.

स्रोत

पाषाण युगाला सुरुवात म्हणजे काय तर, पनामा माकडांनी दगडाचा वापर करून रोजची कामं करण्यास सुरुवात केली आहे. टणक कवच असलेले फळ तोडण्यासारखी कामं ते करतात. अशा प्रकारे दगडाचा वापर करणाऱ्या फार कमी वानर प्रजाती अस्तित्वात आहेत. पश्चिम आफ्रिकेतील चिम्पान्झी, थायलंड मधील मकाका वानर आणि कॅप्युशीन माकड हे त्यातलेच एक.

मंडळी, माकडांची उत्क्रांती हा विज्ञानाच्या दृष्टीने एक मोठा शोध आहे. सध्या संशोधक पनामा मंकीचा अभ्यास करत आहेत. या अभ्यासातून आणखी काही गोष्टी बाहेर पडतील.

राव, अशा पद्धतीने माकड सुद्धा माणसाच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. कदाचित पुढील काही शतकांमध्ये माकड सुद्धा माणसात आलेला असेल !!

 

आणखी वाचा :

यांच्यातही माणसासारखीच संवेदना : यांचा जिव्हाळा पाहून तुम्हालाही गलबलून येईल...

सबस्क्राईब करा

* indicates required