computer

गाणी ऐकताना अंगावर काटा येणं, थंड शहारा येणं याचा वैज्ञानिक अर्थ जाणून घ्या !!

संगीत ही मनामनाला जोडणारी एक सुंदर भाषा आहे. हा अनुभव प्रत्येकाने घेतला असेलच. पण आपल्यापैकी अशीही काही माणसं असतात की गाणं ओळखीचं असुदे वा अनोळखी ते ऐकल्यानंतर त्यांचे अंग शहारून येते. हा अनुभव तसा दुर्मिळ आहे. हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतंच असं नाही. काहीजणांना हा अनुभव कधीच येणार नाही असेही होऊ शकते. निसर्ग हा भेदभाव कसा करतो हे शास्त्रज्ञांना पडलेलं कोडं आहे. या कोड्याचा शोध घेता घेता शास्त्रज्ञांना मानवी मनाच्या काही नव्या गमतीजमती कळल्या आहेत. 

गाणं तुम्ही ऐकता, आम्हीही ऐकतो मग हे लोक वेगळे कसे ? चला समजून घेऊ.

एखादं गाणं ऐकल्यानंतर अंगावर काटा येणे किंवा थंड शहरा येणे ही खूप "असामान्य" गोष्ट आहे. एका संशोधनाअंती असे लक्षात आले आहे की फक्त 50% लोकांनाच संगीतावर अशा प्रकारे व्यक्त होता येते. जगातील सर्वच लोक संगीतावर अशाप्रकारे व्यक्त होऊ शकत नाहीत. जर तुम्ही असं काही अनुभवत असाल तर तुमचा मेंदू हा इतरांपेक्षा वेगळा कार्य करतो हे जाणून घ्या.

या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी वीस लोकांची निवड केली होती. या वीस लोकांना शास्त्रज्ञांनी त्यांची आवडती गाणी ऐकवली. जेव्हा जेव्हा त्या लोकांना संगीत ऐकून शहारे जाणवले तेव्हा तेव्हा त्यापैकी फक्त दहा जणांनी बझर दाबला. त्यानंतर त्या वीसही जणांची "एम. आर. आय." तपासणी करण्यात आली आणि निरीक्षणाअंती असे लक्षात आले की ज्या दहा जणांना शहारे जाणवले त्यांचे मेंदू इतर दहा जणांपेक्षा अत्यंत तल्लख पणे काम करत आहेत.

ते दहा जण भावनिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ असल्याचे या संशोधनात आढळले आहे. या संशोधनामुळे शहारे जाणवण्याचे कारण जरी पूर्णपणे लक्षात आले नसले तरी त्याची प्रक्रिया जाणून घेण्याचा संशोधकांनी प्रयत्न केला आणि संशोधनाअंती अशा जाणिवांचे काही फायदेही लक्षात आलेले आहेत. 2007 च्या एका अहवालानुसार ज्या व्यक्तीला संगीत ऐकल्यानंतर शहारे जाणवतात ती व्यक्ती इतरांपेक्षा जास्त चिकित्सक असते आणि ती व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ असते असे आढळून आहे. थोडक्यात काय तर शहारे येणे म्हणजे तुमचं मन अप्रत्यक्षरीत्या त्या गाण्यासोबत जोडलं जात आहे.

 

लेखक : रोहित लांडगे

 

आणखी वाचा : 

ब्रेकअप झाल्यावर लोक sad songs का ऐकतात ?? हे आहे त्या मागचं कारण !!

सबस्क्राईब करा

* indicates required