computer

शेतकऱ्याच्या डोक्यावर उगवलं शिंग ? बातमी खरी की खोटी ?

काही दिवसापासून इंटरनेटवर एक फोटो फिरत आहे. फोटो सोबतच्या बातमीत लिहिलंय की या शेतकऱ्याच्या डोक्यावरून शिंग उगवलं आहे. आजच्या लेखात आपण या बातमी मागचं सत्य जाणून घेणार आहोत.

मंडळी, ही बातमी पण खरी आहे आणि तो शेतकरी पण. मध्यप्रदेशमध्ये राहणाऱ्या श्यामलाल यादव या ७४ वर्षांच्या आजोबांच्या डोक्यावर हे शिंग उगवलं होतं. फोटोत दिसत असल्याप्रमाणे हे शिंग वाटत असलं तरी ते खरोखरचं शिंग नाही.

२०१४ साली श्यामलाल यांना डोक्याला मार लागला होता. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर गोळा तयार होऊ लागला. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, पण तो गोळा जसजसा वाढू लागला तशी त्यांना काळजी वाटू लागली. हा गोळा काही दिवसांनी टणक झाला आणि तो दिसायला एखाद्या शिंगासारखा दिसू लागला.

वैद्यकीय भाषेत या शिंगाला सेबेशियस किंवा क्युटेनियस म्हणतात. हा ट्युमरचा एक प्रकार असतो. या प्रकारातील ट्युमर धोकादायक नसतो, पण धोका निर्माण करण्याची क्षमता त्याच्यात असते. हे शिंग केराटीन या प्रथिनापासून तयार झालेलं होतं. हेच प्रथिनं आपल्या नखातही सापडतं.

मंडळी, श्यामलाल यांच्या डोक्यावरून ट्युमर काढण्यात आलेला आहे. त्यांच्यावर रेडियेशन किंवा केमोथेरपीने उपचार केला जाईल.  सध्या सुरु असलेल्या उपचाराला त्याचं शरीर योग्य प्रतिसाद देत आहे. ते लवकरच बरे होतील.

तर मंडळी, हे आहे या व्हायरल गोष्टी मागचं सत्य. तुम्हाला पोस्ट आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.

सबस्क्राईब करा

* indicates required