computer

शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या ऑस्कर नामांकित डॉक्युमेंटरीचा ट्रेलर प्रत्येक भारतीयाने पाहायलाच हवा !!

भारतात प्रयोगशील चित्रपट निर्माण होत नाहीत ही कायमची तक्रार आहे. हॉलिवूडच्या बरोबरीचे सोडा पण हॉलीवुडच्या जवळ जाणारे चित्रपट सुद्धा भारतात तयार होत नाहीत. पण काही आश्वासक तरुण आता पुढे यायला लागले आहेत राव!! गेल्या काही वर्षात आलेल्या सिनेमांमधील बदल सगळे लक्षात घेत आहेत.

डॉक्युमेंटरीची पण तीच गोष्ट! सारख्या त्याच त्याच विषयावर डॉक्युमेंटऱ्या बनवल्याने नावीन्य उरले नव्हते. पण नावीन्य ओतून काम केले की जग दखल घेते हे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

मोती बाग या उत्तराखंड मधील शेतकऱ्याच्या आयुष्यावर बेतलेल्या डॉक्युमेंटरीचे नामांकन थेट ऑस्करसाठी झाले आहे. निर्मल चंदर डायरेक्टर असलेली ही डॉक्युमेंटरी विद्यादत्त नावाच्या शेतकऱ्यावर बेतलेली आहे. 

हिमालयातल्या कुमाऊ, गढवाल सारख्या प्रदेशातील लोक शेती सोडून बाहेर जात आहेत. गावात राहून शेती करणारा आणि लोकांना गावातच राहून शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या एका शेतकऱ्याची ही गोष्ट आहे. एकेक करून सगळे गाव सोडून गेले तर गावात राहून शेती कोण करणार हा प्रश्न त्याला सतावतो. 

या डॉक्युमेंटरीद्वारे नेपाळी शेतकऱ्यांची सुद्धा कैफियत मांडली आहे. पूर्ण उत्तराखंडला अन्न नेपाळी शेतकरी अन्न पुरवतात पण त्यांनाच चिनी, बहादूर म्हणून हिणवले जाते. एकंदरीत या एका डॉक्युमेंटरीने महत्वाच्या विषयांना हात घातला आहे.

मंडळी आता भारतीयांनी पण कात टाकायला सुरुवात केली आहे. आपले चित्रपट पण आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवू लागले आहेत. दर्शक म्हणून आपण पण वेगळ्या स्वरूपाच्या प्रयोगांना प्रोत्साहन दिले तर येत्या काळात ही संख्या अजून वाढू शकते.

 

लेखक : वैभव पाटील.

सबस्क्राईब करा

* indicates required