computer

या पत्रकार बाई चक्क मेलेल्या माणसाला प्रश्न विचारायला गेल्या !!

मंडळी, भारतीय रिपोर्टर्सवर नेहमीच टीका होत असते. तशी करणं पण असतात. आता श्रीदेवींच्या मृत्युनंतर काही रिपोर्टर्सनी त्यांच्या मृत्यूचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. चांद्रयान मोहिमेच्यावेळी एक रिपोर्टर स्पेस सूट मध्ये रिपोर्टिंग करत होता. अशी बरीच उदाहरणं आहेत, पण असो.

मुद्दा असा आहे की फक्त भारतीय रिपोर्टर्सना नावं ठेवण्यात अर्थ नाही. त्यांच्यासारखे जगात अनेक रिपोर्टर मिळतील. आता या बाईंनाच बघा.

मंडळी, यांचं नाव आहे सारा वेल्क. अमेरिकेच्या KTLA न्यूजसाठी त्या रिपोर्टिंग करतात. या बाईनी आपल्या कामाला भलतंच मनावर घेतलंय आणि त्यांनी असं काही करण्याचा प्रयत्न केलाय की तुम्हाला विश्वास बसणार नाही. अमेरिकेतल्या या पत्रकार बाई एक बातमी देताना म्हणाल्या, की “मी मेलेल्या माणसापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला, पण तो बोलण्यासाठी जागेवर नव्हता"...

तुम्ही अगदी बरोबर वाचलं. हा व्हिडीओ पाहा आणि स्वतःच ऐका.

हा व्हिडीओ कोणत्या तारखेचा आहे हे समजू शकलेलं नाही. एका अज्ञात व्यक्तीने तो इंटरनेटवर पोस्ट केल्यानंतर बातमी व्हायरल झाली. या पत्रकार बाईंना नेमकं काय म्हणायचं आहे याच्यावर लोकांनी चांगलंच तोंडसुख घेतलं.

तर मंडळी, काय म्हणाल या पत्रकारितेला ?

सबस्क्राईब करा

* indicates required