त्यांना गप्पी मासे का म्हणतात ठाऊक आहे?

"गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा" हे तर सगळ्यांना माहित आहे. पण या छोट्या माशांना गप्पी हे मजेदार नांव का पडलं ठाऊक आहे?

 

तर हा गप्पी मासा लहान कीटक अन्न म्हणून खात राहातो. रॉबर्ट जॉन लेशमीर गप्पी ( Robert John Lechmere Guppy) या ब्रिटिश शास्त्रज्ञाला तो १७६६मध्ये  त्रिनिदाद बेटावर सापडला. या माशांचं लहान कीटक खात राहाणं आणि त्यांच्या प्रजननाचा जलद वेग पाहून हे मासे रोगनिवारणासाठी उपयुक्त ठरतील हे गप्पी या शास्त्रज्ञाच्या लक्षात आलं. 

त्यामुळे या माशांना त्यांच्या संशोधकावरून गिरार्डिनस गप्पी (Girardinus guppii)हे नाव पडले. पण कालांतराने गिरार्डिनस गळून पडले आणि आज आपण त्या माशांना गप्पी मासे म्हणूनच ओळखतो.  गंमतीची गोष्ट अशी की या माशांचा उपयोग अमेरिकेत आधीच ठाऊक होता. फक्त त्याची जगाला ओळख करून द्यायला आर. जे. एल. गप्पींना तो सापडावा लागला!

२० ऑगस्ट हा जागतिक डास दिन. त्याच दिवशी डासांना खाणार्‍या माशांची माहिती ्देणं जरा क्रूरच आहे, नाही का?

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required