विंडोज ऑपरेटींग सिस्टमचा डिफॉल्ट ड्राईव्ह C का असतो ? A किंवा B का नाही?

कधी विचार केला आहे का राव, विंडोज ऑपरेटींग सिस्टमचा डिफॉल्ट ड्राईव्ह C  का असतो? त्याच्या आधीचीअक्षरं म्हणजे  A आणि B का नाही? तसं पाहायला गेलं तर आता A आणि B ड्राईव्ह अस्तित्वात पण नसतात. पण त्यांच्या नसण्यामागे सुद्धा काय कारण आहे? प्रश्न तसा टेक्निकल  आहे, पण उत्तर अगदी सोप्पंय.

तर याचं उत्तर असं.....

स्रोत

जेव्हा कॉम्पुटरचा शोध लागला तेव्हा हार्ड डिस्क अस्तित्वातच नव्हत्या. हार्ड डिस्कच्या जागी फ्लॉपी डिस्क वापरल्या जायच्या. फ्लॉपी डिस्क आधी एकाच साईजमध्ये असायची. सव्वापाच इंच!! नंतर आणखी एक  साईज आली, साडेतीन इंच. ही सव्वापाच इंच साईजच्या फ्लॉपीमध्ये १६०KB,  ३६०KB किंवा १.२MB डेटा मावयाचा, तर साडेतीन इंचाच्या फ्लॉपीमध्ये१.४४MB !! काही असलं तरी, प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये दोन फ्लॉपी घालण्यासाठी दोन ड्राइव्हज असायच्या आणि त्यांना  A  आणि B असं नाव असायचं. 

स्रोत

पुढच्या काळात हार्ड डिस्कचा शोध लागला. पण हार्ड डिस्क महाग नसल्याने फ्लॉपी डिस्कची मागणी कमी झाली नाही. कालांतराने हार्ड डिस्कसुद्धा कॉम्पुटरमध्ये येऊ लागली. या ड्राईव्हला C नाव देण्यात आलं.  या सगळ्या बदलांमुळे फ्लॉपी डिस्कची गरज संपली. ऑपरेटिंग सिस्टम हार्ड ड्राईव्हवर सेव्ह होऊ लागली. इंटरनल स्टोरेज म्हणून हार्ड डिस्कला मागणी वाढली आणि हो, जास्त कपॅसिटीचे पेन ड्राइव्ह ही तोवर मिळू लागले होते. फ्लॉपी डिस्क अत्यंत बेभरवशाच्या होत्या, कधी खराब होतील सांगता यायचं नाही. त्यामुळं पेन ड्राइव्ह आल्यानंतर फ्लॉपीची मागणी खूपच कमी झाली. 

आयबीएमची हार्ड डिस्क (स्रोत)

आता फ्लॉपी डिस्क नसल्याने A आणि B नावाचे ड्राईव्ह अस्तित्वात नाहीत. फ्लॉपी डिस्क गेल्यानंतर A नाव हार्ड ड्राईव्हला देता आलं असतं, पण C हेच नाव पुढे कायम राहिलं. आज फ्लॉपी डिस्कचा वापर अत्यंत कमी ठिकाणी होतो. जवळजवळहोताच नाही म्हणा ना.

स्रोत

ड्राईव्हला सोप्पी नावं देण्याची पद्धत IBM ने (१९६० साली) सुरु केली. हीच पद्धत इतर ऑपरेटिंग सिस्टम्सने घेतली. IBM चा ऑपरेटिंग सिस्टम सुरुवातीच्या मोजक्या ऑपरेटिंग सिस्टम्स मधला एक होता.

 

आणखी वाचा :

जाणून घ्या इंटरनेट विश्वातल्या रोचक गोष्टी, ज्या तुम्हाला माहित असायलाच हव्यात...