अबब.. ओडिशात सापडला इतक्या वयाचा खडक !! अंदाज बांधा याचं वय काय असेल ??

भारतात एक महत्वाचा शोध लागलाय राव. ओडीसा मध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात प्राचीन खडक सापडला आहे. हा खडक तब्बल ४२ कोटी ४० लाख वर्ष जुना असल्याचं म्हटलं जातंय. या शोधाने अनेक शास्त्रज्ञांच्या नजरा भारतावर रोखल्या गेल्या आहेत.

चला या शोधाविषयी आणखी जाणून घेऊया...

शास्त्रज्ञांनी ८ वर्षांपूर्वी ओडीसाच्या ‘चाम्पुवा’ भागातून एका खडकाचे नमुने गोळा केले होते. या खडकावर संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञांना त्यात ‘मॅग्मॅटिक झिर्कोन’ हे खनिज आढळले. हे खनिज तब्बल ४२ कोटी ४० लाख वर्ष जुने असल्याचं या संशोधनातून सिद्ध झालं आहे.

कोलकाता, चीन आणि मलेशियाच्या भूगर्भशास्त्रज्ञांनी या शोधात महत्वाची भूमिका बजावली होती. या संशोधनाचा अहवाल नुकताच ‘Scientific Report’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला. या अहवालात म्हटल्याप्रमाणे झिर्कोनचा इतका जुना अवशेष या आधी ऑस्ट्रेलियाच्या ‘जॅक हिल्स’वर सापडला होता.

स्रोत

मंडळी, हा शोध लागण्याची मोहीम एवढी सोप्पी नव्हती. कोलकात्यातील भूगर्भशास्त्रज्ञ डॉक्टर मुजुमदार आणि चौधरी या खडकावर वर्षभर संशोधन करत होते. पण पुढील संशोधन करण्यास त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत लागणार होती. हे तंत्रज्ञान भारतात नसल्याने त्यांनी ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी आणि अमेरिकेतील प्रयोगशाळांना मदत मागितली. शेवटी त्यांना बीजिंग मधल्या SHRIMP Center या प्रयोगशाळेतून पुढील संशोधनासाठी परवानगी मिळाली. पुढे जो शोध लागला त्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलं.

मंडळी, भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने भारतातील हा शोध अत्यंत महत्वाचा आहे.

 

आणखी वाचा :

बैकाल सरोवर : जगातील सर्वात खोल आणि प्राचीन सरोवर !!

सबस्क्राईब करा

* indicates required