f
computer

क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने खाल्ली अशी ३ वेळा माती !!

समजा, क्रिकेट मध्ये बदमाशी करण्याचा विश्वचषक असता तर तो जिंकण्याचा मान कायमस्वरूपी ‘ऑस्ट्रेलिया’ला मिळाला असता हे कालच्या ‘बॉल टँम्परींग’च्या प्रकरणात पुन्हा एकदा सिद्ध झाले. बॉल टँम्परींग, स्लेजिंग या सारख्या अखिलाडू कृत्यांसाठी कांगारू जगभर प्रसिद्ध आहेत, पण सर्वसाक्षी कॅमेरा सगळं पाहातच असतो. त्यांच्या क्रिकेट कुकर्माचा पाढा वाचावा तेवढा कमीच आहे. पण आम्ही तुमच्या समोर आज काही मोजकेच नमुने ठेवतो आहे.

१. अंडरआर्म बॉलिंग

१९८१ साली मेलबर्न येथे झालेला ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामना त्याकाळात गाजला तो अंडरआर्म बॉलिंगमुळे. न्यूझीलंडला या सामन्यात ६ रन्स हवे होते आणि शेवटच्या बॉलला ऑस्ट्रेलियन कॅप्टनने बॉलरला अंडरआर्म बॉलिंग करण्यास सांगितली. अंडरआर्म बॉलिंगमुळे न्यूझीलंडला सिक्स मारून सामना जिंकता येऊ नये म्हणून हा प्रकार करण्यात आला होता. या घटनेनंतर क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाची प्रतिमा डागाळली.

२. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून अपशब्द

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर ‘स्लेजिंग’ बद्दल अनेकदा आरोप केला जातो. स्लेजिंग म्हणजे प्रतिस्पर्ध्याला शिव्या देऊन, टोमणे मारून किंवा धमकावून त्याचं लक्ष विचलित करणे. असाच एक किस्सा घडला होता भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्याच्या दरम्यान. भारतीय गोलंदाज श्रीनाथने ‘रिकी पाँटिंग’ला बाउन्सर बॉल टाकला. या बाउन्सरमुळे रिकी पाँटिंग’ला किरकोळ दुखापत झाली. खेळात अश्या घटना घडतच असतात पण त्याने याचा बदल घेण्यासाठी श्रीनाथ ला शिव्या देण्यास सुरुवात केली. या घटनेला खिलाडू वृत्तीने न घेता रिकी पाँटिंग अरेरावी वर उतरला होता.

३. जावेद मियादाद आणि डेनिस लिली यांच्यातील वाद

१९८१-८२ च्या सालात ऑस्ट्रेलियाच्या पर्थ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचा कसोटी सामना एका एका वादामुळे रंगला. जावेद मियादाद आणि डेनिस लिली यांच्यात थेट हाणामारी पर्यंत वाद गेला होता. मियादाद धावा घेण्यासाठी जात असताना लिली मध्ये आला आणि त्यांच्यात वाद सुरु झाला. हा वाद थांबणार इतक्यात लिली ने जावेद मियादादला लाथ मारली. याच्या उत्तरादाखल मियादादने मारण्यासाठी लगेचच आपली बॅट उचलली. लिली वर बॅट उगारलेला मियादादचा फोटो क्रिकेट इतिहासातील एक वादग्रस्त आणि यादगार फोटो ठरला.   

 

याला कांगारूंचे माकडचाळे म्हणायचं का ?