क्रिकेट सामन्याच्या दरम्यान हा अम्पायर उड्या का मारायचा? कारण वाचून चक्कर येईल राव!!

मनात भीती असेल तर त्याचं अंधश्रद्धेत रुपांतर व्हायला वेळ लागत नाही. आता हे ताजं उदाहरण बघा ना राव. क्रिकेटचे नावाजलेले अम्पायर ‘डेव्हिड शेफर्ड’ यांच्या बाबतीत एक गोष्ट सांगण्यात येते, ती अशी कि जेव्हा जेव्हा क्रिकेट सामन्यात १११, २२२ किंवा ३३३ असा स्कोर व्हायचा, तेव्हा-तेव्हा ते उड्या मारायचे. उड्या मारण्यामागचं कारण थोडं गमतीशीर आहे.

आधी तर आपण समजून घेऊया हे तीन आकडी स्कोर आहे तरी काय? मंडळी, १११ किंवा २२२ या प्रकारच्या स्कोरला क्रिकेटच्या भाषेत ‘नेल्सन’ म्हटलं जातं. हा नेल्सन प्रकार ‘अनलकी’ मानला जातो. म्हणजे तुमचा ‘बॅडलक’ खराब असण्याचे चान्सेस असतात. तर यावर उपाय म्हणजे अशावेळी जमिनीशी आपला संपर्क नसला पाहिजे.

जमिनीपासून संपर्क तोडायला आपण काही पक्षी नाही. आणि भर मैदानात खुर्ची टाकून बसताही येत नाही. मग अशावेळी हे डेव्हिडसाहेब उड्या मारायचे. म्हणजे काही सेकंदापुरतं तरी त्यांचं शरीर जमिनीच्या संपर्कापासून दूर राहील. 

या अंधश्रद्धेचा पगडा त्यांच्या मनावर त्यांच्या लहानपणापासून बसला असल्याचं त्यांनी स्वतः कबूल केलं आहे. लहानपण गेलं, पण ती अंधश्रद्धा छोट्या मैदानातून मोठ्या मैदानात आली. 


२७ डिसेंबर हा डेव्हिड शेफर्ड यांचा वाढदिवस. २००९ साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्यानंतरही ते लक्षात राहिले ते त्यांच्या या आगळ्यावेगळ्या सवयीमुळे.

सबस्क्राईब करा

* indicates required