अंडर 19 वर्ल्डकपच्या सामन्यादरम्यान भूकंप होतो तेव्हा.. जाणून घ्या काय घडले!!

सध्या अंडर 19 वर्ल्डकप सुरू आहे. जगभरातील संघ विजेतेपदासाठी झुंजत असताना आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यादरम्यान झालेल्या एका सामन्यात अशी घटना घडली ज्यात क्रिकेटचा तर काही संबंध नाही, पण यामुळे मैदानावरील लोकांसोबतच सामना पाहणारे पण भेदरले होते. कारण मैदानावर थेट भूकंपाचे झटके बसले.

त्रिनिदाद येथील क्विन्स पार्क मैदानावर सेमी फायनलचा सामना सुरू होता. पहिल्या इनिंगच्या ६ व्या ओव्हरदरम्यान स्क्रीनवर स्पष्ट समजत होते की काहीतरी वेगळे घडू पाहत आहे. या दरम्यान कॉमेंट्री करणारी एक व्यक्ती आपल्या सहकाऱ्याला भूकंप आला असे सांगताना ऐकू येत होते.

त्रिनिदाद आणि टोबॅगो दरम्यान शनिवारी सकाळी ५.२ मॅग्नीट्यूडचा भूकंप आला होता. जवळपास १० किमी खोलीचा हा भूकंप सांगितला जात आहे. कॉमेंट्री करणाऱ्या अँड्रू लेनर्डने हा प्रसंग व्यक्त केला आहे. तो म्हणजे की हे कधी संपेल हेच आम्हाला कळत नव्हते. जवळपास १५ ते २० सेकंद हे जबरदस्त धक्क्याचे होते.

तुम्हाला वाटत असेल सामना या भूकंपामुळे सामना थांबवावा लागला असेल. पण तसे काही झाले नाही. मैदानावरील खेळाडू जणू काही झालेच नाही असे वागत होते. आयर्लंडचा विकेटकिपर टीम टॅक्टरने तर इथपर्यंत सांगितले की त्यांना काही ऐकूच आले नाही.

मैदानावर जरी सर्व नॉर्मल वागत असले तरी पॅव्हेलीयनमध्ये सर्व घाबरले होते. त्यांना टेन्शन या गोष्टीचे आले होते की मैदानावर सर्व काही सुरळीत कसे सुरू आहे. जवळपास २० सेकंद हे नाट्य चालले, पण नंतर मात्र सर्वकाही व्यवस्थित झाले.

उदय पाटील

 

सबस्क्राईब करा

* indicates required