सीएसके वि. आरसीबी सामन्यासाठी अशी आहे बोभाटाची ड्रीम ११ टीम

आयपीएल २०२२ (Ipl 2022) स्पर्धेतील ४९ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai super kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal challengers Bangalore) या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगणार आहे. या हंगामात हे दोन्ही संघ १२ एप्रिल रोजी आमने सामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला चेन्नई सुपर किंग्ज संघाने २३ धावांनी पराभूत केले होते.

तसेच आयपीएल २०२२ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आतापर्यंत एकूण १० सामने खेळले आहेत, ज्यात या संघाला ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाला ९ पैकी केवळ ३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. 

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

 फाफ डू प्लेसी (कर्णधार), दिनेश कार्तिक, रजत पाटीदार, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, जोश हेझलवूड, महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज

 चेन्नई सुपर किंग्ज

 एमएस धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, रॉबिन उथप्पा, डेवॉन कॉनवे, मिचेल सँटनर, महिश थिक्षणा, सिमरनजीत सिंग, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी

या सामन्यासाठी अशी आहे बोभाटाची ड्रीम ११ टीम 

दिनेश कार्तिक, फाफ डू प्लेसी, विराट कोहली, डेवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड़, रविंद्र जडेजा, ग्लेन मैक्सवेल, वानिन्दु हसारंगा, जोश हेज़लवुड, महीश थिक्षणा, मुकेश चौधरी

कर्णधार - ऋतुराज गायकवाड

 उपकर्णधार - विराट कोहली

सबस्क्राईब करा

* indicates required