विराटला आरसीबीचे कर्णधारपद देऊ नये, माजी भारतीय खेळाडूने केले वादग्रस्त वक्तव्य

आयपीएल २०२२ स्पर्धा येत्या २६ मार्च पासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत चाहत्यांना रोमांचक सामने पाहायला मिळणार आहे. परंतु या स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार कोण असेल याची घोषणा करण्यात आलेली नाहीये. अनेकांनी याबाबत आपले मत मांडले आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की, विराट कोहलीने पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करावे. तर अनेकांनी ग्लेन मॅक्सवेल किंवा फाफ डू प्लेसिसला संघाचे कर्णधारपद द्यावे असे म्हटले आहे. दरम्यान विराट कोहलीला संघाचे कर्णधारपद देण्याबाबत माजी भारतीय क्रिकेटपटूने मोठे वक्तव्य केले आहे.

विराट कोहलीने गतवर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता ही फ्रँचायजी नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. या संघाचा कर्णधार कोण होईल? याची घोषणा येत्या १२ मार्च रोजी एका मोठ्या इव्हेंटद्वारे करण्यात येणार आहे.

याबाबत बोलताना भारतीय संघाचा माजी फलंदाज आकाश चोपडा याने आपल्या युट्युब चॅनेलवर म्हटले की, "माझ्या मते आरसीबीने विराट कोहलीला संघाचे कर्णधारपद देऊ नये. त्याला मोकळेपणाने खेळता यावं म्हणून त्याने हा निर्णय घेतला होता. आता पुन्हा त्यावर दबाव टाकू नका. आम्हाला एक मनसोक्तपणाने फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीला पाहण्याची संधी मिळू शकते. त्याच वय वाढत आहे आणि त्याने आतापर्यंत भरपूर दबाव सहन केला आहे."

सबस्क्राईब करा

* indicates required