MCC ने बदलला कॅच आऊट होण्याचा महत्वाचा नियम, समजावून घ्या!!

क्रिकेट या खेळात गेल्या काही वर्षांपासून अनेक महत्वाचे बदल झाले आहेत. सुरुवातीला फक्त कसोटी क्रिकेट खेळले जायचे. १८७७ रोजी पहिल्यांदाच अधिकृत कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आला होता. त्यानंतर १९७१ मध्ये वनडे क्रिकेटला सुरुवात झाली. ५० षटकांचा सामना आणि वेगवान क्रिकेट पाहून प्रेक्षक देखील या फॉरमॅटकडे आकर्षित झाले होते. या फॉरमॅटला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर २००४ मध्ये पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला होता. क्रिकेटच्या स्वरूपात बदल होत होते. त्यामुळे क्रिकेटच्या नियमांमध्ये देखील गरजेनुसार बदल करण्यात आले होते. आता क्रिकेटच्या आणखी एका नियमात मोठा बदल करण्यात आला आहे.

मेरीलिबोन क्रिकेट क्लब तर्फे क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल करण्यात येत असतो. येत्या १ ऑक्टोबर पासून क्रिकेटच्या महत्वाच्या नियमात बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल आणि प्रत्यक्षात अनुभवलं देखील असेल की, जेव्हा फलंदाज झेलबाद होतो त्यावेळी फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्नात एकमेकांना ओलांडतात. अशा परिस्थितीत नवीन येणारा फलंदाज हा नॉन स्ट्राइकला जातो आणि दुसऱ्या टोकावरील फलंदाज पुढील चेंडू खेळतो. परंतु आता नव्या नियमानुसार, फलंदाज झेल बाद झाल्यास नवीन येणाऱ्या फलंदाजाला पुढील चेंडू खेळण्याची संधी मिळणार आहे. तसेच षटकातील शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद झाल्यास दुसऱ्या टोकावर असलेल्या फलंदाजाला पुढील चेंडू खेळण्याची संधी मिळणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required