बुद्धिबळात जिंकायचंय? या पाच टीप्स नक्कीच उपयुक्त ठरतील..

१) बुद्धिबळ खेळाच्या तीन  अवस्था असतात . पहिली सुरुवात (Opening),  दुसरी मध्यपर्व (Middle Game) आणि तिसरी शेवट (End Game). खेळ जिंकण्यासाठी खेळायचा असतो म्हणजेच खेळाचे अंतिम ध्येय  "जिंकणे" हेच आहे म्हणून हा खेळ शिकताना पहिले शेवट, मग मध्यपर्व आणि सुरुवात असा शिकावा. 

२) या खेळाच्या प्रत्येक अवस्थेत वेगवेगळे हेतू असतात, सुरुवातीच्या चालींचा हेतू असतो डावाचा विकास करणे (Development), मध्यपर्वाचा हेतू असतो स्थितिवचक वस्तुनिष्ठ लाभ (Positional Advantage) आणि शेवट या अवस्थेचा हेतू असतो शह आणि मात (Checkmate). 

३) नवोदित खेळाडूंनी पटाकडे विशेष लक्ष द्यावे.  पटावर एकूण ६४ चौकोन  असतात त्यापैकी मधले ४ चौकोन अत्यंत महत्वाचे असतात. जो  खेळाडू या चौकोनांचा ताबा मिळवतो व कायम ठेवतो  त्याची जिंकण्याची शक्यता वाढते.  

४) खेळाडूंनी सुरुवातीच्या चालींमधील सापळ्यांचा (ट्रॅप) विशेष सराव करावा, त्याने आपला खेळ सुधारायला मदत होते  

५) विश्वविख्यात बुद्धिबळ खेळाडूंचे सामने अभ्यासावे ; विशेषतः गॅरी कॅस्पारॉवचे ; त्याने खेळ सुधारतो.

 

आता काही समजूती आणि गैरसमजूतींचे निराकरण करू या.

अ. चांगला खेळ ही बुध्दीवान लोकांची मिरासदारी आहे.

इतर खेळात जशी सरावाची गरज असते तसाच सराव या खेळात पण करावा लागतो. जर सराव नसेल तर तर बुध्दीपण साथ देत नाही.

बिल गेट्स आणि कार्ल्सन हा खेळ बघा. एक मायक्रोसॉफ्टचा मालक तर एक विश्व जेता. दोघेही अत्यंत बुद्धिमान. या खेळात बिल गेट्सचा पराभव फक्त नऊ चालींत झाला.

 

ब. ऐन वेळेवर चाली सुचल्या पाहिजेत असा काहींचा आग्रह असतो. 

होय, अचानक सुचलेली चाल हे बुध्दीमंत असल्याचे लक्षण आहेच पण सतत अभ्यास असणे हे आवश्यक आहे. कार्लसनसारखा खेळाडू एका वेळेस दहा हजार गेम लक्षात ठेवतो. इतकेच नव्हे तर गॅरी कॅस्परॉवला हरवलेला संगणक ’आयबीएम डीप ब्ल्यू’ हा एकावेळी स्वत:च्या आणि गॅरीच्या अशा दोघांच्या मिळून पुढच्या चाळीस चालींचा अभ्यास करून मगच  चाल खेळत असे. 

 

क. खेळात जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी खेळाडू बद्दल मनात पूर्वग्रह नसावेत. 

सोबत कार्लसन विरुध्द कॅस्पारॉव यांच्या खेळाची चित्र फीत बघा. कास्पारॉव कार्लसनला लिंबूटिंबू समजून खेळायला आला आणि लिंबूटिंबूच्या चाली बघून त्याला घाम फुटला.शेवटी बारा वर्षाच्या कार्लसनसोबत बरोबरी करण्याची नामुष्की कॅस्पारॉव वर आली.

 

सबस्क्राईब करा

* indicates required