computer

१६ वर्षांच्या भारतीय पोराने बुद्धिबळात वर्ल्ड चॅम्पियनला हरवलंय....बातमी वाचा !!

Subscribe to Bobhata

भारताचा एक १६ वर्षाचा ग्रँडमास्टर सध्या जागतिक बुद्धिबळ विश्वात धुमाकूळ घालतोय. निहाल सरीन असे त्याचे नाव!! गेल्या काही दिवसांपासून हा पठ्ठ्या चक्क विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन सोबत थेट भिडतोय. इतकंच नाही,तर हा गडी बऱ्याच वेळा वरचढ ठरत असतो.

नुकत्याच झालेल्या एक मिनिट चेस शूटआऊटमध्ये कार्लसन आणि निहाल समोरासमोर आले. गेम संपल्यावर अनुक्रमे स्कोर होता. 19 आणि 13!!

(कार्लसन आणि निहाल)

एवढेच नाहीतर मागच्या आठवड्यात झालेल्या ब्लिट्ज गेम मध्ये तर त्याने कार्लसनला धूळ चारली होती. आपल्या देशातला एक 16 वर्षीय पोरग वर्ल्ड चॅम्पियनला हरवतो ही गोष्ट निश्चितच अभिमानाची आहे. ब्लिट्ज या गेम प्रकाराबद्दल बोलायचे झाल्यास इथे चाल पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला 3 मिनिट वेळ दिला जातो. एका अर्थाने क्रिकेटमधील T-20 सारखा हा प्रकार आहे. चार वेळा जागतिक चॅम्पियन असलेला कार्लसन म्हणतोय की निहाल ब्लिट्ज प्रकारातला सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे.

सध्या कोरोनामुळे मैदानी खेळ बंद असले तरी ऑनलाईन खेळांना चांगले दिवस आले आहेत. निहालला जेव्हा कळलं की कार्लसन ऑनलाईन खेळतोय तर त्याने स्वतःसोबत खेळण्याचे त्याला निमंत्रण पाठविले. निहाल सांगतो की गेल्या काही वर्षात तो कार्लसन सोबत साधारण 200 गेम्स खेळला त्यात पन्नासेक वेळा निहाल विजयी झाला आहे.

गंमतीची गोष्ट अशी की २००४ साली कार्लसन निहालच्या वयाचा असताना त्याने त्या वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनला असाच धक्का दिला होता. थोडक्यात इतिहासाची पुनरावृत्ती झाली असे म्हणायला हरकत नाही.

 

आणखी वाचा :

बुद्धिबळात जिंकायचंय? या पाच टीप्स नक्कीच उपयुक्त ठरतील..

जागतिक बुद्धिबळ दिन म्हणजे काय ? बुद्धिबळ खेळणे का गरजेचे आहे ? जाणून घ्या मंडळी !!

सबस्क्राईब करा

* indicates required