IPLचा थरार : कोलकाता विरुद्ध हैदराबाद !! कसे आहेत दोन्ही संघ, काय आहे सामन्याची वेळ आणि कुठे बघू शकता??

IPL चा पाहिला सामना तर एकदम बोअरिंग झाला राव. विराट कोहली आणि बंगळुरु संघाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे राव. असो, ते जाऊ द्या. पण आपण आता दुसऱ्या मॅचकडे वळूया. आयपीएल २०१९ चा दुसरा सामना हा कोलकत्ता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन टीममध्ये होणार आहे. गेल्या वर्षी या दोन्ही टीम्सनी चांगली कामगिरी केली होती.  ते पाहता सामना रंगतदार व्हायची अपेक्षा आहे. पण इडन गार्डन्सवर सामना होता असल्यामुळे 'केकेआर'ला फायदा होण्याची शक्यता आहे. तर चला बघुया या मॅचची काय तयारी आहे-

आकडेवारी काय म्हणतेय??

आजवर या दोन्ही संघांनी IPL मध्ये  १५ सामने खेळले आहेत. त्यातल्या ९ सामन्यात विजय मिळवून कोलकाताचा संघ आघाडीवर आहे. इडन गार्डन्सवर सुद्धा कोलकाता संघाला आजवर ५-२ असे यश मिळाले आहे. पण गंमत म्हणजे हैदराबादने या मैदानावर गेल्या वर्षी २ सामने खेळले होते आणि या दोन्हीमध्ये त्यांना विजय मिळाला होता.

कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाता नाईट रायडर्सची बॅटिंग लाईन खूप मोठी आहे आणि कागदावर तरी हैदराबादपेक्षा नक्कीच मजबूत आहे. यांच्यासाठी सुनील नरेन हा एक महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. ओपनिंगला येऊन स्फोटक सुरावात करून देणे तसेच आपल्या बोलिंगने सामन्यात मोठी कामगिरी करू शकतो. नरेन सोबत आंद्रे रसेल हा सुद्धा शेवटी येऊन चांगलीच धुलाई करणारा खेळाडू त्यांच्याकडे आहे.  कोलकात्याच्या बोलिंगची भिस्त आहे त्यांच्या फिरकी त्रिकुटावर. कुलदीप सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सोबत पियूष चावला आणि नरेन आहेतच. या शिवाय न्यूझिलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. एकूणच कॅप्टन दिनेश कार्तिककडे बोलिंगमध्ये चांगले पर्याय आहेत.

सनरायझर्स हैदराबाद

हैदराबाद संघातले दोन महत्वाचे खेळाडू  डेव्हिड वॉर्नर आणि केन विलिमसन दोघेही हा सामना न खेळण्याची शक्यता आहे. त्यांच्या अनुपस्थितीत मार्टिन गुप्तील आणि जॉनी बैरस्टाऊ हे दोघे सलामीला येतील. या दोन्हींमध्ये सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. मधल्या फळीत मनीष पांडे महत्त्वाची कामगिरी करू शकतो आणि विजय शंकर हा फिनिशर म्हणून कामी येऊ शकतो. पण या संघाची खरी ताकद ही बोलिंग आहे. भुवनेश्वर कुमारसोबत सिध्दार्थ कौल आणि खालिल अहमद हे दोघे आहेत पण खरी मजा स्पिनमध्ये आहे.  आजच्या घडीला टी २० मधला सर्वोत्कृष्ट स्पिनर त्यांच्याकडे आहे. साथीला शाकिब-उल-हसन आहेच.

मॅच कुठे आणि कशी पाहणार??

आजचा सामना दुपारी ४ वाजता तुम्ही स्टार नेटवर्कवर आणि ऑनलाईन  Hotstar वर पाहू शकता. या वेळेस आय पी एल मराठीमध्ये पण उपलब्ध आहे. तुम्हाला मराठी कॉमेन्ट्री कशी वाटत आहे हे पण कळवा

सबस्क्राईब करा

* indicates required