computer

आयपीएलच्या इतिहासातील पर्पल कॅप मिळवलेले १३ खेळाडू !!

टी ट्वेन्टी म्हटले म्हणजे बॅट्समनला मोठा भाव असतो. त्यांनी मारलेल्या चौकार आणि षटकारांची जास्त चर्चा होत असते. पण बॉलर पण काही कमी नसतात. मोक्याच्या क्षणी फॉर्मात आलेल्या बॅट्समनची जेव्हा दांडी उडते, तेव्हा बॉलरचे महत्त्व कळते. आयपीएलमध्ये एका सिझनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंना पर्पल कॅप मिळते. आजच्या लेखात आपण २००८ ते २०२० अशा १२ सिझनमध्ये पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंची ओळख करून घेणार आहोत. 

१. २००८

आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये पाकिस्तानी खेळाडू देखील खेळले होते. पाकिस्तानच्या सोहेल तन्वीरने राजस्थान कडून खेळताना सर्वात जास्त २२ विकेट्स मिळवत पर्पल कॅप जिंकली होती. चेन्नई विरुद्ध त्याने घेतलेल्या ६ विकेट्समुळे त्याला चांगली आघाडी मिळाली होती. 

२. २००९

आरपी सिंग म्हणून प्रसिद्ध असलेला रुद्र प्रताप सिंग याने हैद्राबादकडून १६ सामन्यांमध्ये २३ विकेट्स मिळवत पर्पल कॅप मिळवली होती. 

३. २०१०

हैद्राबादच्याच प्रज्ञान ओझा या स्पिनरने २०१० आयपीएलमध्ये पर्पल कॅपची बाजी मारली होती. १६ सामन्यांमध्ये त्याने २१ विकेट्स घेतले होते. 

४. २०११

लसीथ मलिंगा आपल्या धारदार यॉर्करसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईकडून खेळताना त्याने २८ विकेट्स मिळवत पर्पल कॅपसहित मुंबईला फायनलपर्यंत नेऊन ठेवले होते.

५. २०१२

आपल्या तुफान बॉलिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या आफ्रिकन बॉलर मॉर्ने मोर्कल याने दिल्ली कडून खेळताना २५ बॅट्समनना पॅवेलीयनमध्ये पाठवत पर्पल कॅप स्वतःकडे ठेवली होती. 

६. २०१३

वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर खेळाडू डवेन ब्रावो याने चेन्नईकडून खेळताना एकाच सिझनमध्ये तब्बल ३२ विकेट्स घेत पर्पल कॅप जिंकली होती. शिवाय एकाच सिझनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम देखील केला होता.

७. २०१४

२०१४ साली देखील पर्पल कॅप चेन्नईकडेच राहिली होती. मोहित शर्मा याने १६ सामने खेळत २३ विकेट्स मिळवले होते. 

८. २०१५

यावर्षी चेन्नईने आपल्या पर्पल कॅप विजयाची हॅट्रिक केली होती. डवेन ब्रावो याने दुसऱ्यांदा पर्पल कॅपवर हक्क सांगितला होता. त्याने २६ वेळा दांड्या उडवल्या होत्या. 

९. २०१६

या सिझनमध्ये सनरायजर्स हैदराबादने आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. यात भुवनेश्वर कुमारच्या बॉलिंगचा वाटा मोठा होता. त्याने २३ विकेट्स घेत पर्पल कॅप जिंकली होती.

१०. २०१७

आयपीएलच्या या सिझनमध्ये सलग दोन वेळा पर्पल कॅप जिंकण्याचा बहुमान भुवनेश्वर कुमारच्या नावे झाला होता. 26 विकेट्स पाडत त्याने ही कामगिरी केली होती.

११. २०१८

पंजाबचा संघ जरी २०१८ च्या सिझनमध्ये क्रमवारीत तळाशी असला तरी पंजाबचा खेळाडू अँड्रू टे याने पर्पल कॅप स्वतःकडे ठेवली होती. २४ विकेट्ससहित हा पराक्रम त्याने केला होता.

१२. २०१९

चेन्नई कडून खेळणाऱ्या इम्रान ताहीरची कामगिरी खरोखर कौतुकास्पद अशी होती. त्याने २६ विकेट्सच्या जोरावर पर्पल कॅपसहित संघाला फायनलमध्ये नेले होते. 

१३. २०२०

आयपीएलच्या मागील सिझनमध्ये जसप्रीत बुमराह आणि कागीसो रबाडा या मूळ साऊथ आफ्रिकन खेळाडूमध्ये पर्पल कॅपसहित चढाओढ रंगलेली दिसली होती. पण शेवटी रबाडा याने पर्पल कॅपवर नाव कोरले होते.

सबस्क्राईब करा

* indicates required