सुपर सिंधूने चायना ओपन स्पर्धा जिंकली

काही वर्षांपूर्वी , जेव्हा फुलराणी सायना नेहवालचे कोच गोपीचंद होते तेव्हा, एका पत्रकाराने गोपीचंद यांना प्रश्न विचारलेला की "सायना नंतर कोण?" त्याच वेळी क्षणाचाही अवधी ना लावता गोपीचंद उद्गारले होते "पी व्ही सिंधू " 

जेव्हा सिंधूने खरोखरच भारतासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकले तो प्रवास आणि तिची जिद्द बघता अनेकांना गोपीचंदचे ते म्हणणे पटले असेल. 

पण का फक्त एकदा झालेला चमत्कार होता का? अशी शंकाही काही जणांना होती. त्यांना आता सिंधूने आपल्या खेळाचे चोख उत्तर दिले आहे. 

ऑलिम्पिक इतकी मानाची नसेल पण प्रचंड चुरस असलेली "चायना ओपन" स्पर्धा तिने जिंकली आहे. हा तिचा पहिला सुपर सिरीज विजय. चायनीज खेळाडूंना त्यांच्याच देशात हरवणं आणि तेही बॅडमिंटनसारख्या खेळात हे इतकं सोपं नाही महाराजा! आजवर फक्त दोन भारतीयांना हि करामत करता आली होती आणि आज  पी व्ही सिंधूने पहिल्या वाहिल्या सुपरसिरीज मध्ये हि करामत करत तिसरी भारतीय होण्याचा मान पटकावला आहे!!

'बोभाटा'च्या वतीने सुपर सिंधूचे हार्दिक अभिनंदन

सबस्क्राईब करा

* indicates required