पहिल्याच कसोटी सामन्यात आर अश्विन तोडू शकतो कपिल देव यांचा 'हा' मोठा विक्रम

नुकताच भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडली होती. या मालिकेत भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला होता. ही मालिका झाल्यानंतर हे दोन्ही संघ आता कसोटी मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ४ मार्च पासून पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएएस बिंद्रा स्टेडियमवर पार पडणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडू जोरदार सराव करताना दिसून येत आहे. 

तसेच आर अश्विन देखील मैदानावर घाम गाळताना दिसून येत आहे. ज्यावरून स्पष्ट होत आहे की, तो आगामी कसोटी मालिकेत खेळताना दिसून येऊ शकतो. दरम्यान याच मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात तो कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडून काढू शकतो.

कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. तर या यादीत दुसऱ्या स्थानी कपिल देव आहे. आर अश्विनने आतापर्यंत एकूण ४३० गडी बाद केले आहेत. तर कपिल देव यांच्या नावावर ४३४ गडी बाद करण्याची नोंद आहे. आगामी कसोटी सामन्यात ५ गडी बाद करताच तो भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा दुसरा गोलंदाज ठरू शकतो.

या यादीत ४१७ गडी बाद करत हरभजन सिंग चौथ्या स्थानी आहे. प्रत्येकी ३११ गडी बाद करत ईशांत शर्मा आणि जहीर खान ५ व्या स्थानी आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या नावे आहे. त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीत ८०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता.

सबस्क्राईब करा

* indicates required