computer

चेक रिपब्लिकच्या फुटबॉलरने मारलेला गोल ऐतिहासिक का ठरला हे? हा पाहा व्हिडीओ!!

फुटबॉल म्हटले म्हणजे चित्तथरारक प्रसंगांची रेलचेल असते. अगदी एकमेकांना सेकंद आणि इंचाच्या फरकाने चकमा देत खेळाडू गोल करतात. फुटबॉलमध्ये अनेक सामने हे श्वास रोखून धरावेत असेच झाले आहेत. नुकताच एका सामन्यात असाच एक प्रसंग घडला. 

फुटबॉलमधील युरो चषक सुरू आहे. यासाठी युरोपमधील २४ संघ विजेतेपदासाठी भिडत आहेत. याच स्पर्धेत चेक रिपब्लिक आणि स्कॉटलॅंड यांच्या दरम्यान सामना झाला. या सामन्यात झालेला एक गोल मात्र ऐतिहासिक ठरावा इतका भन्नाट होता.

हा व्हिडीओ पाहा:

सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये चेक रिपब्लिकची टीम १-० अशी आघाडी घेऊन होती. सामन्याच्या ५२ व्या मिनिटाला दुसरा हाफ सुरू झाला. सामना सुरू असताना दोन्ही संघातले खेळाडू आपापल्या परीने बॉल स्वतःकडे घेण्यासाठी आणि गोल करण्यासाठी प्रयत्न करत होते.

याच झटापटीत चेक रिपब्लिकचा पॅट्रीक शिक याने बॉल स्वतःकडे घेतला. इकडे तिकडे बॉल फिरवून त्याने गोलपोस्ट पासून १३५ फूट दूरूनच बॉल मारला. हा बॉल हवेत उडाला फुटबॉलच्या भाषेत ज्याला कर्ल म्हटले जाते असे वळण घेत तो गोलपोस्टच्या दिशेने झेपावला. गोलकिपरने बॉल अडवण्यासाठी मोठी उडी घेतली पण तो काय बॉल अडवू शकला नाही आणि पॅट्रीकने गोल केला.

मात्र हा फक्त एक गोल झाला अशातला भाग नाही. या प्रकारचा भन्नाट गोल होणे हे फुटबॉल शौकिनांसाठी पर्वणीच असते. या गोलचे म्हणूनच विशेष महत्व आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required