चित्रपटाच्या स्टोरी पेक्षा कमी नाही 'या' टॉप -३ भारतीय क्रिकेटपटूंची लव्ह स्टोरी..

क्रीडा विश्वात खेळाडूंचे अनेक रोचक किस्से पाहायला मिळत असतात. त्यापैकीच एक किस्सा म्हणजे खेळाडूंच्या प्रेमकहाणीचा किस्सा. आपल्या आवडत्या खेळाडूची गर्लफ्रेंड कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. आज आम्ही तुम्हाला ३ अशा खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या स्टोरी पेक्षा कमी नव्हती. चला तर पाहूया.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा:

विरुष्का म्हणून प्रसिद्ध असलेले विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही एका जाहिरातीची शूटिंग सुरू असताना पहिल्यांदा आमने सामने आले होते. ज्यावेळी अनुष्का शर्मा पहिल्यांदा विराट कोहली समोर येणार होती, त्यावेळी विराट कोहली काहीसा अस्वस्थ झाला होता. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याने मनात निश्चय केला होता, जेव्हा अनुष्का समोर येणार त्यावेळी तो पूर्णपणे ॲटीट्युडमध्ये असेल. या जाहिरातीच्या शूट नंतर त्यांच्यातील जवळीक वाढली. त्यानंतर २०१७ मध्ये दोघेही विवाह बंधनात अडकले.

रोहित शर्मा आणि रितिका सजदेह :

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा आपली मॅनेजर रितिका सजदेहच्या प्रेमात पडला होता. रितिका सजदेह आणि रोहित शर्मा यांची भेट युवराज सिंग मुळे झाली होती. रितिकाने काही वर्षे रोहितची मॅनेजर म्हणून काम केले. त्यानंतर रोहित शर्माला वाटले की, आयुष्याचा जोडीदार म्हणून रितिका सजदेह एक परफेक्ट चॉईस आहे. रोहित शर्माची प्रपोज करण्याची पद्धत देखील जरा हटके होती. आयपीएल स्पर्धेदरम्यान मिळालेल्या रिकाम्या वेळेत, रोहित शर्मा रितिकाला त्या मैदानावर घेऊन गेला जिथे तो बालपणी क्रिकेटचा सराव करायचा. रोहित शर्माने प्रपोज करताच, रितिकाने ही वेळ न दवडता त्याला होकार दिला. आता रोहित शर्मा जेव्हा जेव्हा फलंदाजीला येतो, तेव्हा रितिका त्याला चीयर करण्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावत असते.

एमएस धोनी आणि साक्षी धोनी :

धोनी आणि साक्षीचे वडील एकाच कंपनीत काम करायचे. त्यामुळे दोघेही एकमेकांना खूप चांगले ओळखायचे. मात्र साक्षीच्या वडिलांची बदली झाल्याने दोघेही बरेच वर्ष एकमेकांपासून दूर होते. याच काळात एमएस धोनी क्रिकेटपटू म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात व्यस्त होता. तर साक्षी ताजमध्ये इंटर्नशिप करत होती. २००७ मध्ये जेव्हा धोनी त्या हॉटेलमध्ये गेला. त्यावेळी धोनी आणि साक्षीची भेट झाली होती. दोघेही एकमेकांना पाहून खूप खुश झाले होते. दोघांनी एकमेकांना आपले नंबर दिले. दोघांचं बोलणं सुरु झालं. त्यानंतर दोघांचं प्रेमप्रकरण सुरू झालं. २०१० मध्ये दोघेही विवाह बंधनात अडकले होते.

यापैकी कुठल्या खेळाडूची प्रेमकहाणी तुम्हाला जास्त आवडली? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required